Mayank Agarwal : 'आता अजिबात रिस्क नको...' विमानातील 'त्या' घटनेनंतर अग्रवालने उचलले हे पाऊल, फोटो होतोय व्हायरल

भारतीय क्रिकेटपटू आणि रणजी ट्रॉफीचा कर्णधार मयंक अग्रवालसोबत गेल्या महिन्यात एका फ्लाइटमध्ये एक मोठी घटना घडली होती.
Mayank Agarwal Marathi News
Mayank Agarwal Marathi Newssakal

Mayank Agarwal With Water Bottle : भारतीय क्रिकेटपटू आणि रणजी ट्रॉफीचा कर्णधार मयंक अग्रवालसोबत गेल्या महिन्यात एका फ्लाइटमध्ये एक मोठी घटना घडली होती. खरंतर, रणजी ट्रॉफीमध्ये त्रिपुराविरुद्धचा सामना खेळल्यानंतर त्याने चुकून फ्लाइटमधील सीटवर ठेवलेल्या बाटलीतून काहीतरी प्यायले होते. या घटनेनंतर तो खूप आजारी पडला होता आणि त्याला आयसीयूमध्ये दाखल करावे लागले होते.

Mayank Agarwal Marathi News
Ranji Trophy : IPL सुरू होण्यापूर्वी CSK चे टेन्शन वाढलं! मुंबईलाही पण बसला मोठा धक्का

मयंक अग्रवालने नुकताच फ्लाइटमधील एक सेल्फी सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या फोटोमध्ये तो पाण्याची बाटली हातात धरलेला दिसत आहे. या फोटोसोबत मयंक अग्रवालने कॅप्शनमध्ये लिहिले की, बाबा, आता कोणतीही रिस्क नको. याचा अर्थ मयंक अग्रवाल आता स्वतःची पाण्याची बाटली घेऊन विमात गेला आहे. जेणेकरून त्यांच्यासोबत अशी घटना पुन्हा घडू नये.

Mayank Agarwal Marathi News
Ind Vs Eng : KL राहुलच्या पुनरागमनामुळे कोणत्या खेळाडूचा पत्ता कट? प्लेइंग-11 मध्ये होणार मोठे बदल

कर्नाटक संघाने रणजी ट्रॉफी 2024 मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखाली संघाने रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीतही आपले स्थान निश्चित केले आहे. रणजी करंडक स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी 23 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात विदर्भ आणि कर्नाटकचे संघ आमनेसामने असतील.

Mayank Agarwal Marathi News
BCCI Action Manoj Tiwary : रणजी ट्रॉफीबाबत भाष्य केल्याप्रकरणी क्रीडा मंत्र्यावर BCCIने ठोठावला दंड, काय आहे प्रकरण?

मयंक अग्रवालने टीम इंडियासाठी आतापर्यंत एकूण 21 कसोटी आणि 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या कसोटी सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 41.33 च्या सरासरीने 1488 धावा आहेत. त्याने आतापर्यंत 5 अर्धशतके आणि 4 शतके झळकावली आहेत. त्याच वेळी, त्याने वनडेमध्ये 17.2 च्या सरासरीने केवळ 86 धावा केल्या आहेत. पण मार्च 2022 पासून त्याला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com