INDvsWI : शिखरच्याजागी अखेर मिळालं 'या' फलंदाजाला संघात स्थान

वृत्तसंस्था
Wednesday, 11 December 2019

भारताचा सलामीवीर शिखर धवन याचे नशीब काही बदलण्याचे नाव घेत नाही. तो खराब फॉर्मात असतानाच त्याला सईद मुश्ताक अली स्पर्धेत त्याला दुखापतीने ग्रासले.

नवी दिल्ली : भारताचा सलामीवीर शिखर धवन याचे नशीब काही बदलण्याचे नाव घेत नाही. तो खराब फॉर्मात असतानाच त्याला सईद मुश्ताक अली स्पर्धेत त्याला दुखापतीने ग्रासले. त्यामुळेच त्याला विंडीजविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतूनही माघार घ्यावी लागली आहे. त्याच्याजागी कसोटी सलामीवीर मयांक अगरवालला संघात स्थान देण्यात आले आहे. 

दुखापतीमुळे त्याला विंडीजविरुद्ध सुरु असलेल्या ट्वेंटी20 मालिकेलाही मुकावे लागले आहे. आता त्याला विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही खेळता येणार नाही. 

महाराष्ट्राविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. त्याने स्वत: चार पाच दिवसांत बरे होईल असे सांगितले होते मात्र, त्याची दुखापत बरी होण्यास आणखी काही वेळ लागणार आहे. ट्वेंटी20 मालिकेसाठी त्याच्याजागी आता संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. 

संघातील स्पर्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याने यापूर्वीच कसोटी संघातील स्थान गमावले आहे. गेलेला फॉर्म आणि आता झालेली दुखापत यामुळे त्याचे मर्यादित क्रिकेटमधील स्थानही धोक्यात येऊ शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mayank Agarwal replaces Shikhar Dhawan in Indias ODI squad against WI