esakal | INDvsSA : बाहेर कोहली आणि आत रोहितमुळेच हे शक्य झालं : मयांक 

बोलून बातमी शोधा

INDvsSA : बाहेर कोहली आणि आत रोहितमुळेच हे शक्य झालं : मयांक 

भारताचा सलामीवीर मयांक अगरवालने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार आणि संयमी द्विशतक झळकाविले.

INDvsSA : बाहेर कोहली आणि आत रोहितमुळेच हे शक्य झालं : मयांक 
sakal_logo
By
वृत्तसंस्था

विशाखापट्टणम : भारताचा सलामीवीर मयांक अगरवालने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार आणि संयमी द्विशतक झळकाविले. त्याने 358 चेंडूंमध्ये द्विशतक ठोकले.  कसोटी क्रिकेटमध्ये त्याने आज उपहारापूर्वी शतक झळकाविले आणि त्यानंतर त्याचे मोठ्या खेळीत रुपांतर करत द्विशतक ठोकले. त्यानंतर बोलताना त्याने रोहित आणि विराटने केलेल्या मदतीचा आवर्जुन उल्लेख केला.


तो म्हणाला, ''सतत बाहेरचे जेवण जेवल्यावर घरच्या जेवणाची मोल समजते तसे काहीसे माझे झाले आहे. पदार्पणापासून गेल्या काही सामन्यांत मी सतत भारताबाहेर खेळत असल्याने घरच्या मैदानावर फलंदाजी करण्याचा पुनर्प्रत्ययाचा आनंद मला लाभला. मैदानाबाहेर विराट कोहली आणि मैदानावर रोहित शर्मा मला समजावत होते, की जम बसल्यावर संघाला पार करून नेणारी मोठी खेळी उभारता यायला पाहिजे. रोहितने इतकी झकास फलंदाजी केली, की माझ्यावरचे उरले सुरले दडपणही उडून गेले. विविध फटके मारून आम्ही गोलंदाजांना सतत दडपणाखाली ठेवले. रिव्हर्स स्विपसारखा फटका वापरून समोरच्या कप्तानाला विचारात टाकले. शतकाच्या वेळी मी थोडा विचाराधीन झालो होतो; कारण माझे पहिले कसोटी शतक होते. पण नंतर मी जास्त आक्रमक सकारात्मक फलंदाजी करू शकलो. हवेतून फटके मारतानाही चिंता वाटत नव्हती. दुसऱ्या दिवस अखेरीला भारतीय संघ मस्त अवस्थेत आहे. खेळपट्टीवरची माती हळूहळू मोकळी व्हायला लागली आहे ज्याचा फायदा अश्विन - जडेजाला होणार आहे.''