esakal | सांगलीत 14 ते 17 फेब्रुवारी दरम्यान महापौर चषक कबड्डी
sakal

बोलून बातमी शोधा

सांगलीत 14 ते 17 फेब्रुवारी दरम्यान महापौर चषक कबड्डी
  • पटेल चौक व्यायाम मंडळाच्या क्रीडांगणावर स्पर्धा
  •  राज्यभरातील 450 खेळाडू, 80 पंच यांची निवास, भोजनाची सोय
  • स्पर्धेसाठी 15 ते 20 हजार प्रेक्षक बसतील एवढी गॅलरी, दोन क्रीडांगणे, व्यासपीठ, प्रकाशझोताची सोय
  • निवासस्थान ते क्रीडांगण अशा प्रवासासाठी वाहन व्यवस्था

सांगलीत 14 ते 17 फेब्रुवारी दरम्यान महापौर चषक कबड्डी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली -  येथील महापालिकेतर्फे 14 ते 17 फेब्रुवारी दरम्यान महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. राज्यभरातून पुरुषांचे 16, तर महिलांचे 11 संघ सहभागी झाले आहेत. विजेत्यांना 55, 35 व 15 हजार रुपयांची बक्षिसे, उत्तेजनार्थ, सर्वोत्कृष्ट खेळाडू अशी बक्षिसे देण्यात येणार
आहेत, अशी माहिती महापौर संगीता खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कबड्डी असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष माजी आमदार दिनकर पाटील, आयुक्त रवींद्र खेबुडकर, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, स्थायीचे सभापती अजिंक्‍य पाटील, शेखर इनामदार, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके उपस्थित होते.

सौ. खोत म्हणाल्या,""महापालिकेच्या स्थापनेनंतर सन 2005 पर्यंत कबड्डी, कुस्ती, खो-खो स्पर्धा झाल्या. प्रदीर्घ काळानंतर कबड्डी स्पर्धा होत आहेत. पटेल चौक व्यायाम मंडळाच्या क्रीडांगणावर स्पर्धा होतील. राज्यभरातील 450 खेळाडू, 80 पंच यांची निवास, भोजनाची सोय केली आहे. स्पर्धेसाठी 15 ते 20 हजार प्रेक्षक बसतील एवढी गॅलरी, दोन क्रीडांगणे, व्यासपीठ, प्रकाशझोताची सोय केली आहे. निवासस्थान ते क्रीडांगण अशा प्रवासासाठी वाहन व्यवस्था आहे. सल्लागार, स्वागत, प्रसिद्धी, क्रीडांगण,निवास, भोजन, वाहतूक, वैद्यकीय आदी समित्या स्थापन केल्या आहेत.

रविवारी (ता. 17) महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल. खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, अभिनेते ओम भूतकर, पदाधिकारी, सदस्य उपस्थित असतील.

सहभागी संघ
पुरुष- शाहू सडोली (कोल्हापूर, छावा (शिरोली), ओम साई (पुणे), विजय क्‍लब (मुंबई), सतेज (बाणेर), ओम (ठाणे), शिवशंकर (ठाणे), शारदा स्पोर्टस्‌ (बीड), नवभारत (शिरोली), सम्राट (सांगली), जयमातृभूमी (सांगली), तरुण भारत (सांगली), युवक मराठी (सांगलीवाडी), इस्लामपूर व्यायाम मंडळ (इस्लामपूर), न्यू उत्कर्ष मंडळ (सांगली) व एम. टी. एस. (नंदुरबार).

महिला - शिवशक्ती (मुंबई), महेंद्रदादा फाऊंडेशन (पुणे), जय हनुमान (बाचणी-कोल्हापूर), महात्मा गांधी (मुंबई उपनगर), विश्‍वशांती(पालघर), चिपळूण स्पोर्टस्‌ (चिपळूण), महर्षी दयानंद क्रीडा (मुंबई), अभिनंदन स्पोर्टस्‌ (सांगली), न्यू उत्कर्ष (सांगली), सुवर्णयुग (पुणे), राजमाता (पुणे).

loading image