MC Mary Kom : मेरी कोम, पीव्ही सिंधूची इंडियन ऑलिम्पिक समितीवर झाली निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MC Mary Kom PV Sindhu IOA

MC Mary Kom : मेरी कोम, पीव्ही सिंधूची इंडियन ऑलिम्पिक समितीवर झाली निवड

MC Mary Kom PV Sindhu IOA : भारताची बॉक्सिंगमध्ये पाचवेळा जागतिक अजिंक्यपद पटकावणारी मेरी कोम, दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी पी व्ही सिंधू आणि शिवा केशवन यांची भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या खेळाडूंच्या सामितीवर निवड झाली आहे. आज दिल्लीत पार पडलेल्या निवडणुकीनंतर याची घोषणा करण्यात आली. या तिघांबरोबरच अजून 7 सदस्यांची देखील या समितीवर निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा: MS Dhoni : अमित शहा - धोनी यांची भेट; सोशल मीडियावर होतोय फोटो व्हायरल

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या खेळाडूंच्या सामितीवर वेटलिफ्टर मीराबाई चानू, नेमबाज गगन नारंग, टेबलटेनिसपटू अचंता शरथ कमल, हॉकीपटू राणी रामपाल, सायकलपटू भवानी देवी, रोव्हर बजरंग लाल आणि माजी शॉट पूटर ओपी करहाना यांची देखील निवड झाली आहे. या दहा सदस्यांच्या समितीमधील 5 सदस्य या ऑलिम्पिक खेळलेल्या महिला खेळाडू आहेत. केशवन हा एकटाच विंटर ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेला खेळाडू आहे.

हेही वाचा: मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....

या समितीवर निवड होण्यासाठी फक्त 10 सदस्यांनी आपला अर्ज दाखल केला होता. या समितीत 10 जागांसाठीच निवडणूक होणार होती. त्यामुळे या सर्वांची बिनविरोध निवड झाली. याचबरोबर अभिनव बिंद्रा आणि हॉकीपटू सरदार सिंग हे देखील सहयोगी संस्थांचे सदस्य म्हणून या समितीत असणार आहेत. या दोघांनाही मतदानाचा अधिकार असणार आहे.