Ashes 2019 : स्मिथची हुर्यो उडविली; MCCच्या सदस्याची स्टेडियममधून हकालपट्टी

MCC Member Thrown Out Of Lord’s For Abusing Steve Smith
MCC Member Thrown Out Of Lord’s For Abusing Steve Smith

लंडन : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथला फलंदाजी करताना इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा बाँउन्स लागून जखमी झाला. त्यानंतर त्याला मैदान सोडून जावे लागले. तो मैदान सोडत असताना प्रेक्षकांनी त्याची हुर्यो उडविली. अशातच एका सदस्याला मेरीलिबोन क्रिकेट क्लबने स्मिथची हुर्यो उडविली म्हणून स्टेडियम बाहेर हाकलले.

चौथ्या दिवशी स्मिथच्या मानेवर चेंडू लागला. त्याआधी त्याचा हातही शेकून निघाला होता. स्मिथला 80 धावांवर 'रिटायर्ड हर्ट' व्हावे लागले, पण नंतर तो थोड्या वेळात मैदानावर परतला. त्याने 92 धावांपर्यंत मजल मारली. 

पुन्हा बॅटिंग करून आऊट झालेला स्टीव्ह स्मिथ पॅव्हेलियनकडे जात असताना मात्र प्रेक्षकांनी त्याची हुर्यो उडविली आणि म्हणूनच लॉर्डस पॅव्हेलियनमधून मेरीलिबोन क्रिकेट क्लबने एका सदस्याला हाकलून दिले. 

स्मिथ आखूड टप्प्याच्या वेगवान चेंडूंवर अडखळत खेळत असल्याचे हेरताच आर्चरने आणखी टिच्चून मारा केला. मानेवर लागलेल्या चेंडूचा वेग ताशी 92 मैल इतका होता. त्याच्या भेदक हप्त्यात चेंडूंचा सरासरी वेग ताशी 90 मैल होता. अनेक चेंडू ग्लोव्हज्‌ला लागले. त्या चेंडूंचा वेग ताशी 96.1 मैल होता. स्मिथ "रिटायर्ड हर्ट' झाल्यानंतर पीटर सीड्‌ल फलंदाजीला आला. त्याला आर्चरने टाकलेल्या पहिल्याच चेंडूचा वेग ताशी 95 मैल होता. हा चेंडू थाय पॅडवर (मांडीचे पॅड) लागला. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com