दोन षटकांमधील वेळकाढूपणास लगाम

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 मार्च 2019

लंडन - कसोटी क्रिकेट मृतावस्थेत असताना त्याला पुनरुज्जीवन देण्यासाठी ‘आयसीसी’ने  कसोटी जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेची घोषणा केली आहे. पुढील वर्षीपासून सुरू होणाऱ्या या जागतिक स्पर्धेस अधिक लोकप्रिय करण्यासाठी मेरिलीबोन क्रिकेट क्‍लबने (एमसीसी) कंबर कसली असून, कसोटी क्रिकेट रंजक करण्यासाठी त्यांनी वेगळ्या नियमांची आखणी केली आहे.

दोन षटकांमधील  वेळकाढूपणाला लगाम, एकाच दर्जाचे चेंडू आणि नो-बॉलवर ‘फ्री-हिट’, असे काही नवे नियम क्रिकेट समितीने प्रस्तावित केले आहेत. हे प्रस्ताव मेरिलीबोन क्रिकेट क्‍लबच्या संकेतस्थळावर देण्यात आले आहेत.

षटकांची संथगती राखण्याबद्दल कसोटीत यापूर्वीपासून कारवाई करण्यात येते. याला आता वेगळे स्वरूप देताना गोलंदाजी करणाऱ्या संघाला वेळेच्या बंधनात अडकविण्यात येणार आहे.

ज्या संघांत फिरकी गोलंदाज आहेत; त्यांना दिवसभरात ९० षटके पूर्ण करता येतात. पण, काही वेळा फिरकी गोलंदाज असूनही वेळ लागतो. त्यामुळेच, हा नियम  करण्यात आल्याचे ‘एमसीसी’ने म्हटले आहे. 

‘एमसीसी’कडे हे नियम प्रस्तावित करणाऱ्या समितीचे अध्यक्षपद माईक गॅटिंगकडे होते. समितीत भारताचा सौरभ गांगुली याचाही  समावेश होता. या समितीची  बैठक गेल्या आठवड्यात बंगळूरला झाली. 

...असे आहेत प्रस्तावित बदल
वेळेचे बंधन
गोलंदाज किंवा फलंदाज यांना ४५ सेंकदांत खेळण्यासाठी सज्ज व्हावे लागेल. फलंदाज नव्याने आल्यास हा कालावधी ६० सेकंदांचा आणि गोलंदाज बदलल्यास ८० सेकंदांचा
परिणाम ः प्रतिस्पर्धी संघांपैकी कुणीच या कालावधीत तयार न झाल्यास स्कोअरबोर्डवरील घड्याळ शून्यावर येणार. त्या वेळी वेळकाढूपणा करणाऱ्यास इशारा. त्यानंतरही वेळ लागल्यास डाव संपताना पाच धावांची पेनल्टी
चेंडूचा वापर
विश्‍वकरंडकानंतर सुरू होणाऱ्या जागतिक स्पर्धेनंतर मे-जुलैपासून कसोटी जागतिक स्पर्धेस सुरवात होईल. यात ठरावीक पद्धतीचेच चेंडू वापरले जातील
सध्या भारतात एसजी, इंग्लंडमध्ये ड्यूक्‍स, ऑस्ट्रेलियासह अन्य 
देशांत कुकाबुरा चेंडूंचा वापर
खेळाडूंच्या मतांचा विचार करून चेंडूच्या वापराबाबत होणार निर्णय. भारतीय कर्णधार कोहलीची ‘ड्यूक्‍स’ला पसंती
डीआरएस
मैदानावरील पंचांच्या निर्णयाला दाद मागितली गेल्यास ती प्रक्रिया वेगवान करणार
फलंदाज बाद असेल वा नसेल, हे स्पष्ट असेल; तर तसा निर्णय लगेच दिला जाणार
नो-बॉल
कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत नो-बॉलवर फक्त एक रन आणि जास्तीचा चेंडू दिला 
जायचा
जागतिक स्पर्धेपासून कसोटीतही नो-बॉलच्या पुढच्या चेंडूला ‘फ्री-हिट’ मिळणार. हा नियम एकदिवसीय क्रिकेटप्रमाणेच

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MCC World Cricket Committee new rule