VIDEO: मेघना इंग्लंडवर बरसली; स्नेह राणाने घेतला भन्नाट कॅच

Meghna Singh Indian Pacer Fiery spell Sneh Rana Fabulous Catch
Meghna Singh Indian Pacer Fiery spell Sneh Rana Fabulous Catch esakal

आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत (ICC Women's Cricket World Cup) भारत (India Womens) आणि इंग्लंड (England Womens) यांच्यातील सामन्यात भारताने खराब फलंदाजी केली. भारताचा संपूर्ण संघ 134 धावात गुंडाळला गेला. मात्र भारतीय गोलंदाजांनी चांगली सुरूवात करत इंग्लंडला दोन धक्के दिले. त्यातील मेघना सिंहने (Meghna Singh) घेतलेल्या डेनली वॅटच्या विकेटची चर्चा सध्या होत आहे. आयसीसीनेही मेघना सिंहचा भेदक मारा आणि स्नेह राणाचा (Sneh Rana) भन्नाट कॅचचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

Meghna Singh Indian Pacer Fiery spell Sneh Rana Fabulous Catch
ENGW vs INDW: पोरींची कडवी झुंजी व्यर्थ; गतविजेत्यांनी उघडले विजयाचे खाते

भारताने इंग्लंडसमोर 135 धावांचे माफक आव्हान ठेवल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी चांगली सुरूवात करून सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. वेगवान गोलंदाज मेघना सिंहने सामन्याच्या दुसऱ्याच षटकात पहिल्याच चेंडूवर डॅनली वॅटला 1 धावेवर बाद केले. मेघना सिंहने टाकलेल्या अखूड टप्प्याच्या चेंडूने अनपेक्षितरित्या उसळी घेतली आणि वॅटला चकवले. हा चेंडू वॅटच्या बॅटची कडा घेऊन गलीमध्ये उभ्या असलेल्या स्नेह राणाच्या दिशेने गेला. स्नेह राणाने देखील हवेत डाईव्ह मारत हा कॅच पकडला.

Meghna Singh Indian Pacer Fiery spell Sneh Rana Fabulous Catch
PAK vs AUS: बाबरचे 25 महिन्यानंतर शतक त्यावर अश्विनचे ट्विट

मात्र भारताने इंग्लंडला दोन धक्के दिल्यानंतर कर्णधार हेथर नाईट आणि सिव्हर यांनी डाव सावरत 65 धावांची भागीदारी रचून डाव सावरला. पूजा वस्त्रकारने सिव्हरला 45 धावांवर बाद केल्यानंतर एमी जोन्सने नाईटने 102 धावांपर्यंत मजल मारून दिली. मात्र त्यानंतर मेघना सिंहने सोफिया डंक्ले आणि कॅथरिन ब्रंटला एकाच षटकात बाद केले. त्यामुळे इंग्लंडची अवस्था 6 बाद 128 धावा झाली होती. परंतु कर्णधार नाईटने नाबाद अर्धशतकी खेळी करत इंग्लंडला वर्ल्डकपमधील पहिला विजय साकारला.

दरम्यान, सलामीवीर स्मृती मानधनाची (Smriti Mandhana) 35 धावांची खेळी समाप्त झाल्यानंतर भारताची घसगुंडी उडाली. भारताची अवस्था 3 बाद 61 धावांवरून 7 बाद 86 अशी बिकट झाली. त्यामुळे भारत शंभरी तरी पार करू शकेल का अशी शंका निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर विकेटकिपर रिचा घोष आणि झुलन गोस्वामी यांनी आठव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत भारताला शंभरच्या पार पोहचवले.

मात्र 33 धावांची खेळी करणारी रिचा धावबाद झाली आणि ही जोडी फटली. त्यानंतर 20 धावा करणारी झुलन गोस्वामी देखील बाद झाली. अखेर भारताचा डाव 134 धावात आटोपला. इंग्लंडकडून कार्लेट डेनने भेदक मारा करत 23 धावात 4 बळी टिपले. तर अॅनाने देखील दोन विकेट घेत तिला चांगली साथ दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com