IND vs BAN : स्लॉग ओव्हरमध्ये पुन्हा भारताची धुलाई; बागंलादेशच्या मेहदीने शेवटच्या पाच षटकात..

Mehidy Hasan Miraz
Mehidy Hasan Mirazesakal

India Leak Runs In Slog Over IND vs BAN 2nd ODI : भारतीय गोलंदाजांनी सुरूवातीच्या षटकात दमदार गोलंदाजी करत बांगलादेशची अवस्था 6 बाद 69 धावा अशी केली होती. मात्र बांगलादेशच्या फलंदाजांनी स्लॉग ओव्हरमध्ये भारताची चांगलीच धुलाई करत 50 षटकात 7 बाद 271 धावांर्यंत मजल मारली. मधल्या फळीतील झुंजार फलंदाज मेहदी हसने मिराझने (Mehidy Hasan Miraz) 83 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. त्याने आणि नसुमने शेवटच्या पाच षटकात 68 धावा चोपल्या.

Mehidy Hasan Miraz
David Warner : स्मिथ कर्णधार होताच डेव्हिड वॉर्नरने घेतला मोठा निर्णय; लांबलचक पोस्ट करत म्हणाला...

बांगलादेशने दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 50 षटकात 7 बाद 271 धावा ठोकल्या. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराझने नाबाद शतकी तर मोहम्मदुल्लाने 77 धावांची झुंजार खेळी केली. मेहदी हसनने वनडेमधील आपले पहिलेच शतक ठोकले. भारतीय गोलंदाजांनी डावाच्या सुरूवातीला बांगलादेशला धक्क्यावर धक्के देत त्यांची अवस्था 6 बाद 69 धावा अशी केली होती. मात्र मेहदी हसन मिराझने मोहम्मदुल्लाच्या (77) साथीने सातव्या विकेटसाठी 147 धावांची दमदार भागीदारी रचली.

Mehidy Hasan Miraz
Umran Malik : उमरान मलिकमुळे बांगलादेशमध्ये भीतीचे वातावरण! एक बोल्ड अन् दुसरा...

मेहदीने स्लॉग ओव्हरमध्ये भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत बांगलादेशला 271 धावांपर्यंत पोहचवले. त्याने 83 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. त्याने आठव्या विकेटसाठी नसुम अहमद सोबत 23 चेंडूत नाबाद 54 धावांची भागीदारी रचली. यात नसुमचे 11 चेंडूत 18 धावांचे योगदान होते. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने 3 तर मोहम्मद सिराज आणि उमरान मलिकने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

हेही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com