esakal | धक्कादायक! मेस्सी बार्सिलोनाचा निरोप घेणार?

बोलून बातमी शोधा

messi

ही बातमी क्लबमधून लीक केल्यामुळे मेस्सी नाराज आहे. त्याचबरोबर बार्सिलोना संघाची ताकद पुरेशी वाढवली जात नाही, त्यामुळे संघाची कामगिरी उंचावत नाही आणि त्यासाठी मेस्सीला चाहते जबाबदार धरत आहेत.

धक्कादायक! मेस्सी बार्सिलोनाचा निरोप घेणार?
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

बार्सिलोना : अव्वल फुटबॉलपटू म्हणून लिओनेल मेस्सी बार्सिलोना क्लबचा निरोप घेण्याची शक्यता आहे. त्याचा बार्सिलोनाबरोबरील सध्याचा करार पुढील वर्षी संपणार आहे. त्याच्या नूतनीकरणाची चर्चा मेस्सीने थांबवल्याने ही चर्चा सुरू झाली आहे. मेस्सी आणि बार्सिलोना क्लबच्या पदाधिकाऱ्यांतील धुसफूस वाढली आहे. बार्सिलोनाने काही महिन्यांपूर्वी एर्नेस्टो वॅलवेर्दे यांना मार्गदर्शकपदावरून दूर केले. या घडामोडीसाठी माध्यमांनी मेस्सीला जबाबदार धरले. ही बातमी क्लबमधून लीक केल्यामुळे मेस्सी नाराज आहे. त्याचबरोबर बार्सिलोना संघाची ताकद पुरेशी वाढवली जात नाही, त्यामुळे संघाची कामगिरी उंचावत नाही आणि त्यासाठी मेस्सीला चाहते जबाबदार धरत आहेत. त्यामुळे मेस्सीने दूर होण्याचे ठरवले असल्याचे सांगितले जात आहे.

2011 वर्ल्डकप फिक्सिंग आरोपाचा बार फुसका: श्रीलंकेनेच घेतले आरोप मागे 

मेस्सीने त्याचे वडील जॉर्ज यांच्यासह क्लबबरोबर नव्या कराराबद्दल चर्चा सुरू केली होती. यापूर्वीचा करार 2017 मध्ये झाला होता. नव्या कराराची चर्चा कित्येक दिवस झालेली नाही, त्यामुळे स्पेनमध्ये मेस्सीने बार्सिलोनाचा निरोप घेण्याचे ठरवले असल्याची चर्चा सुरू आहे; मात्र याबाबत मेस्सी तसेच बार्सिलोनाने टिप्पणी करणे टाळले आहे.काही महिन्यांपर्यंत मेस्सीने संघाच्या कामगिरीबाबत थेट टिप्पणी करणे टाळले होते, पण त्याने जानेवारीत मार्गदर्शक वेलवेदरे यांना दूर करण्याचा निर्णय खेळाडूंमुळे झाला, असे सूचित केल्याबद्दल क्लबच्या संचालकांवर टीका केली होती. एवढेच नव्हे, तर त्याने फेब्रुवारीतील मुलाखतीत सध्याची संघाची ताकद चॅम्पियन्स लीग जिंकण्याएवढी नसल्याचे सांगितले होते. कोरोना महामारीमुळे लढती थांबल्यामुळे बार्सिलोनाने खेळाडूंच्या मानधनात कपात करण्याचे ठरवले, त्यास मेस्सीने विरोध केला होता.

क्रिकेटची रंगीत तालीम सुरू; सराव सामन्यात नियमांची काटेकोर अंमलबजावणी 

प्रीमियरविजेत्या लिव्हरपूलचा सिटीकडून धुव्वा

प्रीमियर लीग जिंकलेल्या लिव्हरपूलला मँचेस्टर सिटीविरुद्ध 0-4 अशी एकतर्फी हार पत्करावी लागली. विजेतेपद निश्चित झाल्यानंतरच्या पहिल्याच लढतीत लिव्हरपूलला ही नामुष्की स्वीकारावी लागली. लिव्हरपूलचा 71 लीग सामन्यातील हा केवळ तिसरा पराभव आहे. प्रीमियर लीगविजेते झाल्याबद्दल सिटीने सुरुवातीस लिव्हरपूल संघास मानवंदना दिली; मात्र सिटीने सामन्यात एकतर्फी हुकुमत राखली. सिटीने गोलच्या संधी दवडल्या नसत्या, तर त्यांनी यापेक्षा अधिक सफाईदार विजय मिळवला असता.