

Firing Breaks Out During Football Game In Central Mexico
Esakal
मध्य मेक्सिकोतील एका फुटबॉल मैदानात गोळीबाराची घटना घडली असून यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. एएफपी न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार मध्य मेक्सिकोतील गुआनाजुआतो या अतिसंवेदनशील भागात ही घटना घडली. या ठिकाणी सतत हिंसाचाराच्या घटना घडत असतात. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ११ जणांचा मृत्यू झाला आहे.