

Nat Sciver Brunt Century
ESakal
मुंबई इंडियन्सच्या फलंदाज नॅट सायव्हर ब्रंटने महिला प्रीमियर लीगमध्ये इतिहास रचला. सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या विजयासाठी आवश्यक असलेल्या सामन्यात नॅट सायव्हर ब्रंटने लीगमधील पहिले शतक झळकावले. तिने ५७ चेंडूत १६ चौकार आणि एक षटकार मारत शतक पूर्ण केले. यासह, ती महिला प्रीमियर लीगची पहिली शतकवीर ठरली. तीन हंगामांच्या प्रतीक्षेनंतर महिला प्रीमियर लीगला अखेर पहिले शतकवीर मिळाले.