

Mighty Marathas win Archery Premier League Season 2
Sakal
Mighty Marathas win Archery Premier League Season 2: ‘मायटी मराठाज’ संघाने आर्चरी प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामाचे विजेतेपद पटकावले. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी काकतीय नाइट्सचा ६-२ असा एकतर्फी पराभव केला.
विशेष बाब म्हणजे मराठाजला याच दिवशी झालेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात नाइट्सकडून पराभव पत्करावा लागला होता, परंतु अंतिम सामन्यात त्यांनी जोरदार पुनरागमन करत विजय मिळवला. संघाचा रिकर्व्ह स्टार धिरज बोम्मादेवरा याने या विजयात मोलाची भूमिका बजावली; त्याने अंतिम निशाणा थेट ‘इनर एक्स-रिंग’ मध्ये मारून विजयावर शिक्कामोर्तब केले.