माईक हेसन, शास्त्रींकडून पराभूत तरी झाले विराटचे हेडमास्टर

वृत्तसंस्था
Friday, 23 August 2019

रॉयल चॅलेजर्स बंगळूरने न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन यांना कार्यवाह संचालक म्हणून नियुक्त केले आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज सिमॉन कॅटीच यांची प्रमुखप्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. 

बंगळूर : रॉयल चॅलेजर्स बंगळूरने न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन यांना कार्यवाह संचालक म्हणून नियुक्त केले आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज सिमॉन कॅटीच यांची प्रमुखप्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. 

बंगळूरने आज एका पत्रकाद्वारे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्यासोबतचा करार संपल्याचे जाहीर केले. बंगळूरला यापूर्वी कार्यवाह संचालक हे पद नव्हते. आता हेसन यांच्यावर ही जबाबदारी दिल्यावर त्यांना संघाची धोरणं, व्यूहरचना आणि कामगिरीचे व्यवस्थापनाचे काम असेल. 

हेसन हे आरसीबीच्या संघ व्यवस्थापनाचाही भाग असतील आणि ते खेळाडू आणि प्रशिक्षकांसह काम करतील. हेसन यांनी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या प्रशिक्षकपदी काम केले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mike Hesson appointed RCB Director of Cricket Operations