Mike Tyson vs Jake Paul
Mike Tyson vs Jake Paulesakal

५८ वर्षीय Mike Tyson चा थोडक्यात पराभव अन् Jake Paul ठरला करोडो रूपयांचा मानकरी

Mike Tyson vs Jake Paul Fight : वर्ल्ड हेवी वेट चॅम्पियन राहिलेल्या ५८ वर्षीय माईक टायसनचा जॅक पॉलने ४ गुणांनी पराभव केला.
Published on

Mike Tyson vs Jake Paul Fight: वर्ल्ड हेवी वेट चॅम्पियन राहिलेला बॉक्सर माईक टायसन १९ वर्षांनतर रिंगमध्ये उतरला. त्याचा सामना २९ वर्षीय जेक पॉल सोबत झाला. यूट्यूबर ते बॉक्सर असा प्रवास केलेल्या जेक पॉलने ५८ वर्षीय माईक टायसनचा ७८-७४ असा पराभव केला. पॉलने पहिली फेरी वगळता संपुर्ण सामन्यात आपले वर्चस्व कायम ठेवले. अटीतटीच्या या सामन्यात पॉलने हा सामना चतुराईने जिंकला आणि सामन्याच्या शेवटी ५८ वर्षीय दिग्गज टायसनचा सन्मानही केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com