esakal | मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर, आयसीयूतून बाहेर
sakal

बोलून बातमी शोधा

मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर, आयसीयूतून बाहेर

मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर, आयसीयूतून बाहेर

sakal_logo
By
नामदेव कुंभार

चंडिगड - दिग्गज अॅथलीट मिल्खा सिंग यांना आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे मिल्खा सिंग यांना काही दिवसांपूर्वी आयसीयूत दाखल करण्यात आले होते. 'फ्लाइंग शीख' म्हणून जगभरात ओळखले जाणारे मिल्खा सिंग (Milkha Singh) कोरोना झाल्यामुळे चंदीगढ येथील आपल्या घरातच विलगीकरणात होते. मात्र, अचानक प्रकृती खालावल्यामुळे मोहालीमधील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्यामुळे आयसीयूमधून जनरल वॉर्डात हलवण्यात आलं आहे. (Milkha Singh Still Stable, Out Of ICU)

91 वर्षीय मिल्खा सिंग यांना कोरोनाची कोणताही लक्षणं नव्हती. गेल्या गुरुवारी कोरोना संक्रमित आढळले होते. त्यामुळे ते घरातच विलगीकरणात होते. मिल्खा सिंग यांच्यानंतर त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांनाही कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिल्खा सिंग आणि निर्मल कौर यांच्यावर एकाच रूममध्ये उपचार सुरू आहेत.

हेही वाचा: WTC final कपिल देवचं मोठं वक्तव्य

मिल्खा सिंग पॉझिटीव्ह आढळल्यावर म्हणाले होते की, 'आमचे काही मदतनीस पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे घरातील सर्वांची कोरोना चाचणी केली. फक्त माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. तीन ते चार दिवसांत पूर्णपणे ठीक होईल असं डॉक्टरांनी सांगितलं.'

आशियाई खेळात पाच वेळा मिल्खा सिंग (Milkha Singh) यांनी सुवर्णपदकाची कमाई केली आहेत. 1960 मध्ये रोम येथे झालेल्या 40 मीटर शर्यतीत मिल्खा सिंग चौथ्या क्रमांकावर होते.