esakal | WTC final कपिल देवचं मोठं वक्तव्य
sakal

बोलून बातमी शोधा

kapil dev

WTC final कपिल देवचं मोठं वक्तव्य

sakal_logo
By
नामदेव कुंभार

IND vs NZ, WTC Final 2021 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान 18 जून रोजी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना (ICC WTC Final 2021) होणार आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या या लढतीकडे संपूर्ण क्रीडा प्रेमींचं लक्ष लागलं आहे. दोन्ही संघामध्ये एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडूंचा भरणा आहे. 18 जून ते 22 जून दरम्यान कसोटीचा बॉस कोण? हे ठरणार आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी भारताचा माजी दिग्गज खेळाडू कपिल देव यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता कोण? हे ठरवण्यासाठी एक सामन्याऐवजी तीन सामने असायला हवे होते. असं मत कपिल देव यांनी व्यक्त केलं आहे. (Kapil Dev bats for best of three WTC finals to determine the winner)

साउथैम्प्टन येथे भारत आणि न्यूझीलंडचा संघ भिडणार आहेत. विश्व कसोटी अंजिक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना साउथैम्प्टन ऐवजी लॉर्ड्स अथवा ट्रॅफर्ड येथे पाहायला आवडलं असते, असं कपिल देव म्हणाले. दरम्यान, लॉर्ड्सवर विश्व कसोटी अंजिक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना होणार होता. मात्र, तो शिफ्ट करण्यात आला. कोरोनाचं कारण देत सामना शिफ्ट करण्यात आला. कोरोना महामारीमुळे कठोर नियम बनवण्यात आले आहेत.

हेही वाचा: WTC मध्ये 'हे' तीन भारतीय खेळाडू ठरणार 'गेमचेंजर'

मिड डे या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत कपिल देव म्हणाले की, महत्वाच्या खिताबासाठी एकापेक्षा जास्त सामने खेळणं कधीही चांगलं. सध्याच्या घडीला कोणत्याही सामन्यासाठी तयारी करणं काही मोठी गोष्ट नाही. एकापेक्षा जास्त सामने असते तर दोन्ही संघाना समान संधी मिळाली असती. कसोटी क्रिकेट सत्रांचा खेळ आहे. जास्तित जास्त सत्रे जो संघ आपल्या नावावर करेल तो विजय मिळवेल. तसेच इंग्लंडमधील परिस्थितीही महत्वाची आहे. इंग्लंडमध्ये फलंदाजीत तंत्र महत्वाची भूमिका बजावते. भारताची फलंदाजी मजबूत आहे. मात्र, सध्याच्या घडीला गोलंदाजीही दर्जेदार होत आहे.