Pakistan : गृह मंत्रालयाचा दिलासा; भारतातील वर्ल्डकप खेळण्याचा 'त्या' पाकिस्तानी खेळाडूंचा मार्ग मोकळा

Blind Cricket T20 World Cup Pakistan Team
Blind Cricket T20 World Cup Pakistan Teamesakal

Blind Cricket T20 World Cup : पाकिस्तानचा ब्लाईंड क्रिकेट संघ टी 20 वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतात येणार होता. मात्र त्यांच्या व्हिसाची अडचण निर्माण झाल्यामुळे त्यांच्या संघाला पाकिस्तानातून निघण्यास विलंब होत होता. अखेर भारताच्या गृह मंत्रालयाने पाकिस्तान ब्लाईंड क्रिकेट संघातील 34 खेळाडू आणि अधिकाऱ्यांचा व्हिसा जारी केला. याबाबतची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Blind Cricket T20 World Cup Pakistan Team
FIFA World Cup 2022 : जपाननं सामना गमवला पण जगभर होतंय कौतुक; आनंद महिंद्रांनीही शेअर केला फोटो

दरम्यान, पाकिस्तान ब्लाईंड क्रिकेट संस्थेने भारताने अजून आमचा व्हिसा जारी केला नाही. स्पर्धा आजपासून सुरू होणार आहे असे सांगितले होते. पाकिस्तान ब्लाईंड क्रिकेट संस्थेचे अधिकारी म्हणाले की, 'आम्हाला भारताकडून अजून व्हिसा मिळालेला नाही. स्पर्धा तर आजपासून सुरू होत आहे.' हा अधिकारी पुढे म्हणाला की, स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सोमवारीच पार पडला आहे. अजून आम्हाला व्हिसा मिळाला नाही त्यामुळे आम्ही संघ पाठवू शकू की नाही याबाबत संभ्रम आहे असेही हा अधिकारी म्हणाला होता.

Blind Cricket T20 World Cup Pakistan Team
BCCI : पुरूषांच्या आधी महिला क्रिकेट संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल; कानिटकर नवा बॅटिंग कोच

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार त्यांनी 23 नोव्हेंबरलाच व्हिसासाठी अर्ज केला होता. याचबरोबर ब्लाईंड क्रिकेट काऊन्सिलला यामध्ये लक्ष घालण्यासाठी पत्रव्यवहार देखील केला होता. ब्लाईंड क्रिकेट टी 20 वर्ल्डकप स्पर्धा ही भारतातील 9 शहरात 6 ते 17 डिसेंबरपर्यंत होणार आहे. या 12 दिवस चालणाऱ्या स्पर्धेत भारतासह, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, नेपाळ, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान असे सहा संघ सहभागी होणार आहेत.

हेही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com