Mirabai Chanu: मीराबाई चानू आशियाई स्पर्धेत मुकणार? खांद्याच्या दुखापतीने संकट उभे केले!
Asian Championships: भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानू खांद्याला दुखापतीमुळे आशियाई वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेतून मुकण्याची शक्यता आहे. राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धा या महत्त्वाच्या मालिकांसाठी ती आपली तयारी पुढे ढकलत आहे.
नवी दिल्ली : भारताची अनुभवी खेळाडू मीराबाई चानू ही गांधीनगर येथे होणार असलेल्या आशियाई वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे. खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे ती या स्पर्धेमधून माघार घेणार आहे.