मिराबाई चानूने वर्षभरानंतर पुनरागमन करत ४८ किलो वजनी गटात १९३ किलो वजन उचलून सुवर्ण व नवा विक्रम केला.
पॅरिस ऑलिंपिकनंतरची ही तिची पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती; तिने याआधी ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकले आहे.
ओडिशाच्या प्रीतिस्मिता भोईने ४४ किलो गटात १५० किलो उचलून सुवर्ण जिंकले; तिची प्रेरणादायी कहाणी चर्चेत आली.
India Weightlifting Records at Commonwealth Championships: भारताची स्टार भारोत्तोलक मिराबाई चानू हिने वर्षभरानंतर स्पर्धेत पुनरागमन करताना राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तिने ४८ किलो वजनी गटात ८४ किलो स्नॅच आणि १०९ किलो क्लीन अँड जर्क मिळून १९३ किलो वजन उचलून हा पराक्रम केला. हा राष्ट्रकुल स्पर्धेतील विक्रम आहे. पॅरिस ऑलिंपिकनंतरची ही तिची पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. पॅरिसमध्ये तिने रौप्यपदक जिंकले होते आणि त्यानंतर ती आंतरराष्ट्रीय स्पर्धेपासून दूर होती.