World Cup 2023 : 'पुढचा वर्ल्ड कप मी खेळणार नाही...' सेमीफायनल मॅचपूर्वी दिग्गज खेळाडूची मोठी घोषणा

Australia's Mitchell Starc opens up on ODI retirement
Australia's Mitchell Starc opens up on ODI retirement

Australia's Mitchell Starc opens up on ODI retirement : एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 चा काफिला आता शेवटी म्हणजे उपांत्य फेरीकडे पोहोचला आहे. या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 15 नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

तर दुसऱ्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 16 नोव्हेंबरला कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर सामना होणार आहे. पण यादम्यान ऑस्ट्रेलियन संघाचा अनुभवी खेळाडू मिचेल स्टार्कने आपल्या एका वक्तव्याने सर्व चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Australia's Mitchell Starc opens up on ODI retirement
Ind vs Nz Semi Final : हिशेब चुकते करण्याची वेळ! अपराजितच्या कवचकुंडलांमुळे भारतीय संघ न्यूझीलंडपेक्षा वरचढ

यावेळच्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती, पण पहिले दोन सामने गमावल्यानंतर त्यांनी बॅक केले आणि सलग 7 सामने जिंकून टॉप-4 मध्ये आपले स्थान निश्चित केले.

त्याच वेळी, संघाचा अनुभवी डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने स्पष्ट केले आहे की, तो पुढील एकदिवसीय वर्ल्ड कप खेळताना दिसणार नाही. स्टार्क 2015 मध्ये वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होता.

पुढील वर्ल्ड कप 2027 मध्ये खेळवला जाणार आहे आणि तोपर्यंत स्टार्क 37 वर्षांचा असेल. स्टार्कने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या वर्ल्ड कपनंतर मी लगेच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार नाही, हा फॉरमॅटमध्ये खेळत राहीन, परंतु मी पुढील वर्ल्ड कप खेळणार नाही यात शंका नाही कारण चार वर्षांचा कालावधी मोठा आहे.

Australia's Mitchell Starc opens up on ODI retirement
IND vs NZ Semi-Final : मुंबईत पाण्याचा नाही तर धावांचा पडणार पाऊस? जाणून घ्या वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी

मिचेल स्टार्कने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, तिन्ही फॉरमॅटमध्ये कसोटी क्रिकेट खेळणे ही माझ्यासाठी पहिली प्राथमिकता आहे. कसोटी क्रिकेट सोडण्यापूर्वी मी एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅट खेळणे सोडून देईन.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्याबाबत स्टार्क म्हणाला की, हा वर्ल्ड कप सामना माझ्यासाठी सामान्य सामन्यासारखा आहे. मी अद्याप माझ्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसलो तरी आता स्पर्धेच्या शेवटी प्रभाव पाडण्याची माझ्याकडे चांगली संधी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com