रहाणेपेक्षा हरमनप्रीतचे नशिब भारी; एक खेळी अन् पुन्हा ताजपोशी!

Mithali Raj says Harmanpreet Kaur Will be a Vice Captain for World Cup
Mithali Raj says Harmanpreet Kaur Will be a Vice Captain for World Cup esakal

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या वनडे वर्ल्डकपसाठी (Womens ODI World Cup 2022) न्यूझीलंडमध्ये आहे. वर्ल्डकपची पूर्वतयारी म्हणून न्यूझीलंडबरोबर झालेल्या वनडे मालिकेत अखेरच्या सामन्यात हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) अर्धशतकी खेळी करत आपली संघातील जागा अबाधित राखली होती. तिच्यावर कामगिरीत सातत्याचा अभाव असल्याने टीका होत होती. विशेष म्हणजे वनडे मालिकेत तिचे उपकर्णधारपद (Vice Captain) देखील काढून घेण्यात आले होते. मात्र या खेळीनंतर तिला तिचे उपकर्णधारपदही परत मिळाले आहे. याबाबतीत भारतीय पुरूष क्रिकेट कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) कमनशिबी ठरला. त्याचे उपकर्णधारपदही गेले आणि संघातील स्थानही!

Mithali Raj says Harmanpreet Kaur Will be a Vice Captain for World Cup
साहा पत्रकार धमकी प्रकरण; BCCI ने स्थापन केली चौकशी समिती

मात्र भारतीय महिला वनडे संघाची कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) आज खुलासा केला की वर्ल्डकपमध्ये (Womens World Cup) भारतीय संघाचे उपकर्णधारपद हे हरमनप्रीत कौरच भुषवेल. न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतील (NZWvsINDW) शेटवच्या दोन वनडे सामन्यात दिप्ती शर्माकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले होते. हरमनप्रीत कौर मालिकेतील चौथा सामना खेळली नव्हती. त्यानंतर पाचव्या सामन्यात तिने 63 धावांची खेळी करत टीकाकारांची तोंडे बंद केली होती. या सामन्यात देखील दिप्ती शर्माच (Deepti Sharma) उपकर्णधार होती.

Mithali Raj says Harmanpreet Kaur Will be a Vice Captain for World Cup
ऋतुराज गायकवाडच्या जागी मयांक अग्रवालची लागली वर्णी

दरम्यान, याबाबत मिताली राजने (Mithali Raj) पत्रकार परिषदेत सांगितले की, 'न्यूझीलंड विरूद्धच्या वनडे मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यात दिप्ती शर्माला उपकर्णधार करण्याचा निर्णय निवडसमिती (Selector) आणि बीसीसीआयचा (BCCI) होता. हरमनप्रीत कौर वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची उपकर्णधार असेल.' यंदाचा महिला वनडे वर्ल्डकप (Womens World Cup) हा न्यूझीलंडमध्ये 4 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान होणार आहे. भारत आपला पहिला सामना 6 मार्चला पाकिस्तान बरोबर खेळणार आहे. भारताची सर्वात अनुभवी खेळाडू कर्णधार मिताली राज आपला शेवटचा वर्ल्डकप खेळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com