ICC Women's WC: मितालीचा 'रेकॉर्ड राज'; सचिनच्या रेकॉर्डची केली बरोबरी

सध्या महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक चालू असून न्युझीलंडमध्ये हे सामने सुरु आहेत.
Mithali Raj
Mithali RajSakal

बे ओव्हल (न्यूझीलंड) : भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज ने रविवारी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यादरम्यान एक विक्रमाची नोंद केलीय. सध्या महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक चालू असून न्युझीलंडमध्ये हे सामने सुरु आहेत. या स्पर्धेतील पाकिस्तानविरोधातील पहिल्या सामन्यात तीने हा विक्रम आपल्या नावे केला आहे. तसेच महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याच्या विक्रमाचीही बरोबरी केली आहे.

तीने या सामन्याबरोबर सर्वात जास्त महिला विश्वचषक स्पर्धा खेळण्याचा विक्रम केला आहे. तीने २०००, २००५, २००९, २०१३, २०१७, आणि २०२२ असे सहा विश्वचषक स्पर्धा खेळण्याचा विक्रम केला आहे. त्याबरोबर सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. सचिनने १९९२, १९९६, १९९९, २००३, २००७ आणि २०११ असे सहा एकदिवसीय विश्वचषक खेळण्याचा विक्रम केला होता. पण या विक्रमाच्या रांगेत आता भारताच्या महिला संघाच्या कर्णधाराचा सामावेश झाला आहे.

Mithali Raj
''मोदी सरकारची निवडणूक ऑफर लवकरच संपणार; टँक फुल्ल करा''

त्याचबरोबर मितालीने न्यूझीलंडची माजी क्रिकेटपटू डेबी हॉकले आणि इंग्लंडची शार्लोट एडवर्ड्स यांना मागं टाकलंय. ती सध्या सचिन तेंडूलकर नंतर सहा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळणारी भारताची दुसरी भारतीय खेळाडू म्हणून ओळखली जाणार आहे. दरम्यान ती सचिन तेंडूलकर आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद यांच्यानंतर तिसरी खेळाडू आहे जी सहा विश्वचषक स्पर्धा खेळली आहे.

आजच्या सामन्याच्या दरम्यान भारताने पाकिस्तानविरोधात नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान भारतीय फलंदाजी सुरुवातीला ढासळली होती पण स्मृती मानधना, स्नेह राणा आणि पुजा वस्त्रकार यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने २४४ धावांपर्यंत मजल मारली. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने १३७ धावांवर आपले गुडघे टेकले. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्याचा विजयी जल्लोष करताना मितालीने हा विक्रम आपल्या नावे करुन घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com