
भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिने हरियाना सरकारच्या ऑफरवर आपला निर्णय दिला आहे. हरियाना सरकारने क्रीडा धोरणांतर्गत तिचा गौरव म्हणून तिला तीन पर्याय दिले होते, ज्यातून तिला एका पर्यायाची निवड करायची होती.
तिला ४ कोटींचे रोख बक्षीस, सरकारी नोकरी किंवा हरियाना शहरी विकास प्राधिकरणमध्ये प्लॉट अशा तीन ऑफर होत्या. आता यातून एक पर्याय तिने निवडला असून तसे पत्र सादर केल्याचे समजत आहे.