
मॅक्युलमची मध्यस्थी! सीएसकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू 'निवृत्ती' घेणार मागे?
लंडन : इंग्लंड सध्या न्यूझीलंड विरूद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. नुकतीच इंग्लंडच्या कसोटी संघात खांदेपालट झाले आहे. इंग्लंडच्या कसोटी संघाची धुरा बेन स्टोक्सच्या खांद्यावर आली आहे तर मुख्य प्रशिक्षक म्हणून न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम (Brendon McCullum) काम पाहत आहे. दरम्यान, मॅक्युलमच्या मध्यस्थीमुळेच इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू मोईन अली (Moeen Ali) कसोटीतील आपली निवृत्ती (Retirement) मागे घेण्याची शक्यता आहे. सीएसकेकडून खेळणाऱ्या मोईन अलीने यंदाच्या हंगामात दखल घेण्याजोगी कामगिरी केली आहे.
हेही वाचा: बॅड पॅचमधून जाणाऱ्या अजिंक्यला बसला अजून एक मोठा धक्का
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मोईन अली हा इंग्लंड संघातील एक महत्वाचा खेळा आहे. तो 2019 च्या वर्ल्डकप विजेत्या संघाचा देखील तो भाग होता. दरम्यान, इंग्लंडचा नवा प्रशिक्षक म्हणून मॅक्युलमने पदभार स्विकारल्यानंतर मोईन अलीशी त्याने कसोटीत घेतलेली निवृत्ती मागे घेण्याबाबत चर्चा केली होती अशी माहिती मोईन अलीने दिली.
मोईन अली म्हणाला की, 'मॅक्युलमने मला मेसेज करून विचारले की तू संघात आहेस का? मी आयपीएलमध्ये त्याच्यासोबत खेळलो आहे. त्याची काम करण्याची पद्धत आनंददायी आहे.' दरम्यान, न्यूझीलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेत स्टोक्स आणि मॅक्युलम आपल्या खास रणनितीने मैदानात उतरतील. ही मालिका पाहण्यासाठी मोईन अली खूप उत्सुक आहे.
हेही वाचा: कर्णधार स्टोक्सने पहिल्याच कसोटीत 'खास' जर्सी घालून जिंकली मने
इंग्लंडने या वर्षाच्या सुरूवातीलाच अॅशेस मालिका गमावली होती. त्यानंतर इंग्लंडच्या कसोटी संघात अनेक बदल करण्यात आले. जो रूटने आपल्या कॅप्टन्सीचा राजीनामा दिल्यानंतर नेतृत्वाची धुरा जॉस बटलरच्या खांद्यावर आली. दरम्यान, संघाचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांनी देखील पद सोडले होते. त्यांच्या जागी न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमची नियुक्ती करण्यात आली.
Web Title: Moeen Ali May Be Returned From Test Cricket Retirement After Consulting Brendon Mccullum
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..