पाकिस्तानच्या प्रमुख गोलंदाजाने घेतली 27 व्या वर्षीच निवृत्ती

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 जुलै 2019

पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज मंहमद आमीर याने वयाच्या केवळ 27व्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. 

इस्लामाबाद : पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज मंहमद आमीर याने वयाच्या केवळ 27व्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. 

''पाकिस्तानचे कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मात्र, मर्यादीत षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त घेण्याचा निर्णय घेत आहे,'' असे त्याने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

आमीरने 2009मध्ये 17व्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने 36 सामन्यांमध्ये 119 बळी घेतले आहेत. 2020मध्ये होणाऱ्या ट्वेंटी20 विश्वकरंडकासाठी तंदुरुस्त राहण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे. 

''पाकिस्तानसाठी खेळणे हेच माझे स्वप्न आणि लक्ष्य आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विश्वकरंडकात सर्वोत्तम कामगिरी करण्याचे माझे उद्दिष्ट आहे,'' असेही त्याने सांगितले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mohammad Amir retires from Test cricket At 27