पुन्हा भ्रष्टाचाराचा ठपका; अझरुद्दीन अध्यक्षपदावरुन निलंबित

अझरुद्दीन यांच्यावरील तक्रारीनंतर हैदराबाद असोसिएशन समितीने 10 तारखेला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला.
mohammad azharuddin
mohammad azharuddin File Photo

भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले आहे. असोसिएशनच्या उच्च पदस्थ परिषदेने एका दिवसांपूर्वीच अझरुद्दीन यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. भ्रष्टाचारसंदर्भातील प्रकरणातील चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे, असे समितीने म्हटले होते. अध्यक्षपदासह त्यांच्या सदस्यत्वावर देखील गदा आलीये. मनमानी कारभार, हितंसंबंधाच्या प्रकरणात माहिती देण्यास टाळाटाळ करणे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा उल्लेख या नोटीसमध्ये करण्यात आलाय. (mohammad-azharuddin-removed-from-the-post-of-president-of-hyderabad-cricket-association)

अझरुद्दीन यांच्यावरील तक्रारीनंतर हैदराबाद असोसिएशन समितीने 10 तारखेला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला. मनमानी कारभार करताना नियमाची पायमल्ली केल्याप्रकरणी परिषदेने तुम्हाला निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणातील तपास पूर्ण होईपर्यंत अझरुद्दीन यांना निलिंबित करण्यात येत आहे, असा उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आलाय.

mohammad azharuddin
Euro : इटलीचा हल्लाबोल! दुसऱ्या सामन्यातही ट्रिपल धमाका

27 सप्टेंबर 2019 मध्ये अझरुद्दीन यांची हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. अध्यक्षपदावर विराजमान झाल्यापासून अझरुद्दीन वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे पाहायला मिळाले. अझरुद्दीन यांनी दुबईतील एका क्रिकेट क्लबचे सदस्य असल्याची माहिती लपवून ठेवली होती. या क्लबकडून कथित स्वरुपात काही स्पर्धेचे आयोजनही केले जाते. याला बीसीसीआयची मान्यता नाही. असा ठपका अझरुद्दीन यांच्यावर ठेवण्यात आलाय.

अझरुद्दीन याने भारतीय संघाकडून 334 वनडेत 36 पेक्षा अधिक सरासरीने 9378 धावा केल्या आहेत. वनडेत त्यांच्या नावे 7 शतकासह 58 अर्धशतकाचा समावेश आहे. कसोटीत अझरुद्दीन यांनी 45.03 सरासरीने 6215 धावा केल्या आहेत. यात 22 शतकांसह 21 अर्धशतकांचा समावेश आहे. क्रिकेट जगतात कलात्मक शैलीत खेळणाऱ्या धुरंधर फलंदाजांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. एवढेच नाही तर भारतीय संघाचे यशस्वी कर्णधार म्हणूनही त्यांची ओळख आहे. पहिल्या तीन कसोटी सामन्यात शतकी खेळी करण्याचा पराक्रम करणारे अझरुद्दीन हे क्रिकेट जगतातील एकमेव फलंदाज आहेत.

mohammad azharuddin
WTC Final : प्लेइंग इलेव्हनवर अजिंक्यने असा दिला रिप्लाय

मॅच फिक्सिंगचा आरोप

2000 मध्ये अझरुद्दीन यांच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप झाला. त्यानंतर त्यांच्यावर आजीवन बंदीची कारवाई करण्यात आली. पण 2012 मध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने त्यांची आजीवन बंदी उठवली होती. अझरुद्दीन यांना या निकालाने मोठा दिलासा मिळाला असला तरी त्यांचे क्रिकेट करिअर तोपर्यंत संपुष्टात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com