रोहित नसल्यामुळे राहुल द्रविडचे काम सोपे झाले... कैफने केले मोठे वक्तव्य | India Vs Bangladesh 1st Test Mohammad Kaif | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India Vs Bangladesh 1st Test Mohammad Kaif

Rohit Sharma : रोहित नसल्यामुळे राहुल द्रविडचे काम सोपे झाले... कैफने केले मोठे वक्तव्य

India Vs Bangladesh 1st Test Mohammad Kaif : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 14 डिसेंबरपासून सुरू होत आहे. मात्र या कसोटी मालिकेत भारताचे अनेक महत्वाचे खेळाडू दुखापतींमुळे खेळणार नाहीयेत. रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह हे दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. बांगलादेशविरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात अंगठ्याला दुखापत झालेला भारताचा कर्णधार रोहित शर्मा देखील पहिल्या कसोटीला मुकणार आहे. दरम्यान, भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने रोहितच्या नसण्याचा कोच राहुल द्रविड यांना चांगला फायदा होणार असल्याचे वक्तव्य केले.

हेही वाचा: PAK vs ENG Test Series: पाकिस्तानसाठी वाईट बातमी! ICC ने रावळपिंडीच्या खेळपट्टीवर...

रोहित शर्माला बांगलादेशविरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात दुखापत झाली होती. स्लिपमध्ये फिल्डिंग करताना त्याच्या अंगठ्यावर चेंडू आदळल्याने तो मैदानाबाहेर गेला होता. त्यानंतर तो बोटाला भलेमोठे बँडेज बाधून 9 व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. त्याने नाबाद 51 धावा करून मालिका वाचवण्यासाठी झुंजार फलंदजी केली. मात्र अखेर भारताने सामना 5 विकेट्सनी गमावला. रोहितला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 6 धावांची गरज असताना षटकार मारण्यात अपयश आले.

हेही वाचा: Virat Kohli : पहिल्या कसोटीत रूट, स्मिथसह द्रविडही असेल किंग कोहलीच्या रडारवर

दरम्यान, रोहितला या दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकावे लागणार आहे. याबाबत सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील एका कार्यक्रमात बोलताना भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कौफ म्हणाला की, 'जर रोहित शर्मा संघात असता तर सलामीला कोणाला खेळवायचे याबाबत मोठी डोकेदुखी झाली असती. शुभमन गिलला घ्याचे की केएळ राहुलला सलामीला पाठवायचे हा प्रश्न असता. आता रोहित शर्मा नाहीये त्यामुळे हा प्रश्नच सुटला आहे.'

'पहिल्या कसोटीत गिल आणि केएल राहुल सलामीला येतील. तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा, चौथ्या क्रमांकावर विराट कोहली, पाचव्या क्रमांकावर श्रेयस अय्यर, सहाव्या ऋषभ पंत आणि त्यानंतर गोलंदाज. रोहित नसल्याने द्रविडसाठी संघ निवड एकदम सोपी झाली आहे.'

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....