आता कुठं सुरु झालंय सगळं तर याने लगेच कसोटीतून निवृत्ती घोषित केली

वृत्तसंस्था
Friday, 6 September 2019

कसोटी क्रिकेट हा क्रिकेटचा पाया आहे आणि याच फॉर्ममधून आणखी एक कौशल्यपूर्ण खेळाडूने निवृत्ती घोषित केली आहे. एकीकडे अफगाणिस्तानचा संघ कसोटी क्रिकटमध्ये आपले पाय पसरवू पाहत असतानाचा त्यांचा अष्टपैलू खेळाडू महंमद नबी याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. 

छट्टोग्राम : कसोटी क्रिकेट हा क्रिकेटचा पाया आहे आणि याच फॉर्ममधून आणखी एक कौशल्यपूर्ण खेळाडूने निवृत्ती घोषित केली आहे. एकीकडे अफगाणिस्तानचा संघ कसोटी क्रिकटमध्ये आपले पाय पसरवू पाहत असतानाचा त्यांचा अष्टपैलू खेळाडू महंमद नबी याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. 

अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेनंतर नबी निवृत्ती घेणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे. मात्र, त्याने त्याच्या निवृत्तीचे कारण अद्यापही स्पष्ट केलेले नाही. 

रहमत शाह ठरला अफगाणिस्तानकडून कसोटी शतक ठोकणारा पहिला खेळाडू

''हो, बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यानंतर तो निवृत्त होणार आहे,'' असे अफगाणिस्तानच्या संघाचे व्यवस्थापक नझीम जर अब्दुराहीमझाई यांनी स्पष्ट केले आहे. नुकतेच पाकिस्तानच्या संघातील महंमद आमीर आणि महंमद हफिज यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 

बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात अफगाणिस्तानच्या रहमत शाहने शतक झळकाविले. तो अफगाणिस्तानकडून कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकाविणार पहिला खेळाडू ठरला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mohammad Nabi To Retire From Test Cricket After Bangladesh Test