Mohammad Rizwan : पायानं झेंडा उचलणाऱ्या रिझवानला तुम्ही काय म्हणाल? - Video

मोहम्मद रिझवानने पायाने उचलला पाकिस्तानी झेंडा, चाहते संतापले
Mohammad Rizwan
Mohammad Rizwan
Updated on

Mohammad Rizwan Pakistani Flag : पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान हा त्याच्याच देशातील मोठा स्टार आहे. मात्र अलीकडेच त्याने असे कृत्य केले आहे, ज्यामुळे त्याच्यावर त्याच्याच देशात जोरदार टीका होत आहे. मोहम्मद रिझवानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. तो ज्यामध्ये त्याच्या चाहत्यांना ऑटोग्राफ देताना दिसत आहे. खरे तर ऑटोग्राफ देताना तो पाकिस्तानचा राष्ट्रध्वज पायाने उंचावताना दिसला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहते संतापले आहे.

Mohammad Rizwan
Irfan Pathan MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीने इरफान पठाणचे करिअर केले उद्ध्वस्त?

हा व्हिडिओ कराचीमध्ये रविवारी रात्री झालेल्या टी-20 सामन्यानंतरचा आहे. या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडकडून रोमहर्षक पराभव केला होता. या सामन्यात मोहम्मद रिझवानने शानदार अर्धशतक झळकावले. सध्या ही 7 सामन्यांची टी-20 मालिका 2-2 अशी बरोबरीत सुरू आहे.

Mohammad Rizwan
Irfan Pathan MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीने इरफान पठाणचे करिअर केले उद्ध्वस्त?

पाकिस्तानी चाहते रिझवानच्या दिशेने कॅप, टी-शर्ट आणि झेंडे फेकून ऑटोग्राफ मागत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. रिझवान या गोष्टींवर आलटून पालटून ऑटोग्राफ देत आहे. दरम्यान पाकिस्तानी ध्वजाचा काही भाग त्याच्या पायाजवळ आल्यावर तो तो आपल्या पायावरून उचलून हातात धरला. यामुळे पाक चाहत्यांमध्ये नाराजी आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ आल्यानंतर चाहते रिझवानबद्दल बरेच चुकीचे लिहित आहेत. मात्र काही चाहते असेही आहेत की, जे ही चूक नकळत घडली आहे, असे म्हणताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Thailand Open
Sports News
Vinesh Phogat
Shreyas Iyer
Marathi News Esakal
www.esakal.com