मोहम्मद रिझवान म्हणतो, मी पुजाराला खूप त्रास दिला | Mohammad Rizwan Statement About Cheteshwar Pujara | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohammad Rizwan Statement About Cheteshwar Pujara

मोहम्मद रिझवान म्हणतो, मी पुजाराला खूप त्रास दिला

इस्लामाबाद : पाकिस्तानचा विकेटकिपर आणि धडाकेबाज फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) हा सध्या काऊंटी क्रिकेटमध्ये आपले कसोटी क्रिकेटमधील बॅटिंग तंत्र घोटवत आहे. त्याच्या जोडीला भारताचा अव्वल कसोटीपटू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) देखील आहे. हे भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू इंग्लंडमध्ये ससेक्सकडून एकत्र खेळत आहे. चेतेश्वर पुजाराने ससेक्सकडून खेळताना दोन शतके आणि दोन अर्धशतके ठोकली आहे. या कामगिरीच्या जोरावर त्याने पुन्हा एकदा कसोटी संघातील आपली दावेदारी सादर केली.

हेही वाचा: इंग्लंडकडून मोठी ऑफर; मॅक्युलम केकेआर सोडणार?

दरम्यान, आयसीसी 2021 क्रिकेटर ऑफ द इयर निवडला गेलेल्या मोहम्मद रिझवानने भारताच्या चेतेश्वर पुजाराचे तोंडभरून कौतुक केले. रिझवान पुजाराच्या एकाग्रतेचा फॅन झाला आहे. त्याने एकाग्रतेच्या बाबतीत युनिस खान आणि फवाद आलम यांच्याबरोबर चेतेश्वर पुजाराचे देखील नाव घेतले. रिझवानने 'क्रिकवीक'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'भारत (India) - पाकिस्तान (Pakistan) कट्टरतेच्या पार्श्वभूमीवर माझ्या आणि पुजाराच्या बाबतीत बोलायचे झाले तर मला यात काहीच वेगळे जाणवले नाही. जर तुम्ही त्याला देखील विचाराल तर तोही हेच म्हणले. मी त्याच्यासोबत खूपवेळा संभाषण केले आहे. मी त्याला त्रासही दिला आहे. आमच्या संघातील कोणालाही हे तुम्ही विचारू शकता.'

हेही वाचा: एबी डिव्हिलियर्स पुढच्या वर्षी आरसीबीमध्ये परतणार; विराटने दिले संकेत

रिझवान पुजाराची स्तुती करत म्हणाला की, 'तो एक चांगला आणि प्रेमळ व्यक्ती आहे. त्याची एकाग्रता (Concentration) आणि लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता जबरदस्त आहे. जर तुम्हाला त्याच्याकडून काही शिकण्याची संधी मिळाली तर तुम्ही हीच गोष्ट शिकली पाहिजे.' रिझवान पुढे म्हणाला की, 'मी माझ्या संपूर्ण कारकिर्दित ज्या खेळाडूंना एकाग्रतेच्या बाबतीत अव्वल मानत आलो आहे. त्यात युनिस भाई, फवाद आलम आणि चेतेश्वर पुजारा देखील सामील आहे. या यादीत पुजारा दुसऱ्या तर फवाद आलम तिसऱ्या स्थानावर आहे.'

हेही वाचा: RR vs DC Live : दिल्लीसाठी 'करो या मरो' स्थिती

'मी ज्यावेळी लवकर बाद झालो त्यावेळी मी चेतेश्वर पुजाराबरोबर याबाबत बोललो. त्यावेळी त्याने मला शरिराच्या जवळ खेळाण्याचा सल्ला दिला. आम्ही सगळे कायम मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळत असतो. तेथे आम्ही शरिराच्या लांबून खेळतो. कारण चेंडू फार स्विंग, सीम होत नसतो.'

Web Title: Mohammad Rizwan Statement About Cheteshwar Pujara Concentration

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top