एबी डिव्हिलियर्स पुढच्या वर्षी आरसीबीमध्ये परतणार; विराटने दिले संकेत | Virat Kohli Hint AB de Villiers Will Be Back | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एबी डिव्हिलियर्स पुढच्या वर्षी आरसीबीमध्ये परतणार; विराटने दिले संकेत

एबी डिव्हिलियर्स पुढच्या वर्षी आरसीबीमध्ये परतणार; विराटने दिले संकेत

मुंबई : रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) एबी डिव्हिलियर्सबाबत (AB de Villiers) मोठे संकेत दिले. आरसीबीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेल्या एका व्हिडिओत विराट बोलत होता. त्यावेळी त्याने पुढच्या वर्षी डिव्हिलियर्स आरसीबीमध्ये (RCB) परतणार असल्याचे सांगितले. डिव्हिलियर्स आरसीबीशी अनेक वर्षापासून जोडला गेला आहे.

हेही वाचा: CSK ला मोठा धक्का; रवींद्र जडेजा आयपीएल 2022 मधून बाहेर?

विराट कोहली म्हणाला, 'मी डिव्हिलियर्सला खूप मिस करतोय. तो सध्या त्याच्या कुटुंबियांबरोबर अमेरिकेत आहे. तो गॉल्फ खेळण्यात व्यग्र आहे. मात्र तो आरसीबीवर लक्ष ठेवून आहे. आणि मला आशा आहे की तो पुढच्या वर्षी एका वेगळ्या भुमिकेत आरसीबीमध्ये परतेल.'

विराट कोहली सध्या त्याच्या सर्वात मोठ्या बॅड पॅचमधून जात आहे. त्याने यंदाच्या हंगामात 12 सामन्यात फक्त 216 धावाच केल्या आहेत. त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. याचबरोबर तो यंदाच्या हंगामात तीनवेळा गोल्डन डकवर बाद झाला आहे. तो बाद झाल्यानंतर तो स्वतःवरच हसला होता. या व्हिडिओत याबाबत देखील विराट बोलला. तो म्हणाला, 'माझ्या कारकिर्दित मझ्याबाबत यापूर्वी असे कधीच झाले नव्हते. त्यामुळे मी हसलो. मी सध्या खेळ जे काही सर्व दाखवतो ते पाहत आहे असे मला वाटते.'

हेही वाचा: 'इथे कमजोर संघाला जागा नाही' पराभवानंतर गंभीर ड्रेसिंग रूममध्ये संतापला!

याचबरोबर विराट कोहली आपल्यावर होणाऱ्या टीकेबाबत देखील बोलला. तो म्हणाला की, 'ते माझ्या जागी नाहीत. त्यांना मला कसं वाटत याची कल्पना नाही. त्यांना तो क्षण जगलेला नाही. मी या बाहेरचा आवाज कसा टाळतो तर मी टीव्ही म्यूट करतो किंवा त्यांच्याकडे लक्ष देत नाही.'

Web Title: Virat Kohli Hint Ab De Villiers Will Be Back In Rcb In Next Year

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top