esakal | शमीने दिल्या असत्या दोन रन्स कमी, विकेटचीही जादा हमी 
sakal

बोलून बातमी शोधा

mohammed shami

शमीला वगळल्याने रंगले ट्‌विटर युद्ध 
विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीत वेगवान गोलंदाज महंमद शमीला वगळल्याने सोशल मिडीयावरून भारतीय संघ व्यवस्थापनावर सडकून टिका करण्यात आली. माजी खेळाडू, समालोचकांसह चाहत्यांमध्ये या निर्णयावरुन ट्‌विटर युद्धच सुरू होते. 

शमीने दिल्या असत्या दोन रन्स कमी, विकेटचीही जादा हमी 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

क्रिकेटमध्ये जर-तरला अर्थ नसतो, पण त्यावरूनच सगळी चर्चा रंगते. संघात कोण आहे आणि त्याला कुणाऐवजी घेतले आहे यावरूनही आकडेमोड केली जाते. यामुळे भारतीय संघ जाहीर होताच त्यात महंमद शमी नसल्यामुळे चर्चा झडली. भुवनेश्वर कुमारचे स्थान कायम राहिले. 

यावरून या दोघांमध्ये एका संकेतस्थळावर 
आकडेवारीनुसार तुलना करण्यात आली. त्याचा तपशील असा ः 

निकष ः स्ट्राईक रेट (या सामन्यापूर्वी) 
तपशील-भुवनेश्वर-शमी 
पहिली 46 षटके-62-20.44 
निष्कर्ष ः शमीने 8.1 षटकांत दोन विकेट जास्तच घेतल्या असत्या 

निकष ः इकॉनॉमी रेट 
तपशील-भुवनेश्वर-शमी 
पहिली 46 षटके-4.9-3.67 
निष्कर्ष ः शमीने 8.1 षटकांत दोन धावा कमीच दिल्या असत्या 
हा विचार केला तर मग भारताचे आव्हान डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार 237 धावांऐवजी 229 झाले असते. 

शमीला वगळल्याने रंगले ट्‌विटर युद्ध 
विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीत वेगवान गोलंदाज महंमद शमीला वगळल्याने सोशल मिडीयावरून भारतीय संघ व्यवस्थापनावर सडकून टिका करण्यात आली. माजी खेळाडू, समालोचकांसह चाहत्यांमध्ये या निर्णयावरुन ट्‌विटर युद्धच सुरू होते. 

शमी स्पर्धेत आतापर्यंत केवळ चार सामने खेळला असून, त्याने 14 गडी बाद केले आहेत. लेगस्पीन गोलंदाज युजवेंद्र चहलला संघात स्थान देताना त्यांनी कुलदीपला वगळले. मात्र, शमीला स्थान देण्यात आले नाही. शमीला श्रीलंकेविरुद्धच्या अखेरच्या साखळी लढतीसाठी देखील वगळण्यात आले होते. समालोचन करणाऱ्या सौरभ गांगुलीने कोहलीच्या या निर्णयावर प्रश्‍न उपस्थित केला. मात्र, त्याचा सहकारी आकाश चोप्रा याने चहलच्या निवडीचे आणि पाच गोलंदाज खेळविणे तसे जिकरीचे होते. पण, प्रथम गोलंदाजी करण्याची संधी मिळाल्यामुळे हा निर्णय योग्य वाटतो. यामुळे भारतीय फलंदाजीला खोली मिळेल, असे ट्‌विट केले. 

हर्षा भोगले यांनीही ट्‌विटरवरून शमीला वगळण्याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले. "शमी विकेट घेत असताना त्याला वगळणे धक्कादायक होते. जडेजाच्या समावेशामुळे भारतीय फलंदाजीची खोली वाढली हे ठीक आहे. पण, न्यूझीलंडविरुद्ध यापूर्वी ज्याने चांगली कामगिरी केली, त्या कुलदीपला वगळण्याचे कारण कळत नाही.'असे भोगले यांनी म्हटले आहे. 

भारताने सर्वोत्तम गोलंदाजाऐवजी अष्टपैलू खेळाडूंना पसंती दिली अशी देखील टिका सोशल मिडीवरून करण्यात आली. विकेट घेणाऱ्या शमीला भुवीसाठी वगळणे न पटण्यासारखे आहे, असेही एकाने म्हटले आहे.

loading image