Mohammed Shami : शमी बुमराहची जागा घेऊ शकेल; रेकॉर्ड काय सांगतंय?

Mohammad Shami T20 international IPL Record
Mohammad Shami T20 international IPL Record esakal

Mohammad Shami T20 international IPL Record : बीसीसीआयने 14 ऑक्टोबरला जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमीचा टी 20 वर्ल्डकप संघात समावेश केल्याची घोषणा केली. जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपला मुकला. त्याची जागा कोण घेणार याबाबत भारतीय क्रिकेट वर्तुळात मोठी उत्सुकता होती. यासाठी मोहम्मद शमी, दीपक चाहर आणि मोहम्मद सिराज यांची नावे आघाडीवर होती. मात्र निवडसमितीने अनुभवी मोहम्मद शमीवर विश्वास दाखवला. विशेष म्हणजे मोहम्मद शमी गेल्या वर्षी दुबईत झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये शेवटचा टी 20 सामना खेळला होता. त्यामुळेच तो जसप्रीत बुमराहची जागा घेऊ शकणार की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळेच मोहम्मद शमीचे टी 20 रेकॉर्ड काय सांगते हे पाहणेही उत्सुकतेचे ठरते.

मोहम्मद शमीची गुजरात टायटन्सकडून IPL 2022 मध्ये केलेली कामगिरी

  • मोहम्मद शमीने आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून देण्यात चांगला हातभार लावला.

  • मोहम्मद शमी गुजरात टायटन्सकडून आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक विकेट (20) घेणारा गोलंदाज ठरला.

  • विशेष म्हणजे मोहम्मद शमी गुजरात टायटन्सकडून सर्वच्या सर्व 16 सामने खेळला.

  • पॉवर प्लेमध्ये त्याने 11 विकेट्स घेतल्या. मुकेश चौधरीसोबत तो संयुक्तरित्या हंगामात पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला.

  • त्याने हंगामात 6.62 च्या सरासरीने धावा दिल्या.

  • त्याची स्लॉग ओवरमधील धावा देण्याची सरासरी 9.36 इतकी आहे.

शमीचे आंतरराष्ट्रीय टी 20 रेकॉर्ड

  • मोहम्मद शमीने भारताकडून 17 आंतरराष्ट्रीय टी 20 सामने खेळले आहेत. त्याने जवळपास 60 च्यावर षटके टाकली आहेत.

  • मोहम्मद शमीने आतापर्यंत 18 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत.

  • त्याने 2021 मध्ये स्कॉटलँडविरूद्ध 15 धावात 3 बळी घेतले होते. ही त्याी आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यातील बेस्ट बॉलिंग फिगर आहे.

  • भारताकडून टी 20 खेळताना त्याची धावा देण्याची सरासरी ही 9.54 इतकी असून तो धावा देण्याच्या बाबतीत महागडा गोलंदाज ठरतो.

मोहम्मद शमीचे IPL रेकॉर्ड

  • गुजरात टायटन्सच्या हा वेगवान गोलंदाज IPL इतिहासात सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत 18 व्या स्थानावर आहे.

  • मोहम्मद शमीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 93 सामन्यात 338 षटके गोलंदाजी करत 2 हजार 890 धावा दिल्या आहेत.

  • मोहम्मद शमीने आतापर्यंत आयपीएलमध्ये 99 विकेट्स घेतल्या आहेत. 15 धावात 3 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. 2020 मध्ये पंजाब किंग्जकडून खेळताना त्याने दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध ही कामगिरी केली.

  • शमीची आयपीएलमध्ये विकेट्स घेण्याची सरासरी ही 29.19 इतकी आहे. तर धावा देण्याची सरासरी 8.52 इकती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com