
भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि आशा भोसले यांची नात जनाई भोसले एकमेकांना डेट करत आहेत का? नुकताच दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्यांनी जोर पकडला होता. आता जनाई आणि सिराज या दोघांनीही इंस्टाग्राम स्टोरीज पोस्ट करून अफेअरच्या अफवांचे सत्य सर्वांसमोर ठेवले आहे. मात्र, जनाईने सर्वात आधी ही गोष्ट पोस्ट केली. जी सिराजने त्याच्या अकाऊंटवर शेअर केली.