PAK vs NZ: असं काय घडलं की पाकिस्तानच्या खेळाडूनं थेट उंपायरचे पायच पकडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Mohammad Wasim Jr’s throw hits umpire Aleem Dar on ankle during PAK vs NZ 2nd ODI

PAK vs NZ: असं काय घडलं की पाकिस्तानच्या खेळाडूनं थेट उंपायरचे पायच पकडले

Pakistan vs New Zealand 2nd ODI: न्यूझीलंडने दुसऱ्या ODI मध्ये पाकिस्तानचा 79 धावांनी पराभव केला. या सामन्यात बाबर आझम वगळता एकही पाकिस्तानी फलंदाज क्रीजवर टिकू शकला नाही. यासह किवी संघाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. सामन्यात असं काय घडलं की पाकिस्तानच्या खेळाडूनं थेट उंपायरचे पायच पकडले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा: क्रिकेटर कोहली धोनीच्या मुली ट्रोल; दिल्ली पोलिसांना कारवाईचे आदेश

न्यूझीलंडच्या डावाच्या 35व्या षटकात जेव्हा ग्लेन फिलिप्स फलंदाजी करत होता आणि हॅरिस रौफ गोलंदाजी करत होता. षटकाच्या चौथ्या चेंडूवर फिलिप्सने डीप स्क्वेअर लेगवर शॉट खेळला आणि चेंडू तिथं क्षेत्ररक्षण करत असलेल्या वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीम ज्युनिअरकडे गेला. वसीमने चेंडू फेकला आणि चेंडू अलीम दारच्या पायाला लागला. यानंतर अलीम दार रागात दिसले आणि त्याने हातात धरलेली जर्सी जमिनीवर फेकून दिली. यानंतर पाकिस्तानी खेळाडू आणि कर्णधार बाबर आझम मैदानावर हसताना दिसला.

हेही वाचा: Kohli-Dhoni: कर्णधार होण्यासाठी कोहलीने धोनीसोबत घेतला होता पंगा, शास्त्रीचा फोन अन्...

न्यूझीलंडसाठी स्टार सलामीवीर फलंदाज डेव्हॉन कॉनवेने तुफानी खेळी खेळली. त्याने कर्णधार केन विल्यमसनसोबत उत्कृष्ट भागीदारी केली. कॉनवेने 92 चेंडूत 101 धावांची खेळी केली. त्याचवेळी विल्यमसनने 85 धावा केल्या. या दोन्ही खेळाडूंमुळे किवी विजयाची नोंद करण्यात यशस्वी ठरला. पाकिस्तानकडून मोहम्मद नवाजने सर्वाधिक 4 बळी घेतले.