Kohli-Dhoni: कर्णधार होण्यासाठी कोहलीने धोनीसोबत घेतला होता पंगा, शास्त्रीचा फोन अन्...

धोनी-विराटमध्ये सर्व काही ठीक नव्हते?
virat kohli spoiled the relationship with ms dhoni
virat kohli spoiled the relationship with ms dhoni

Virat Kohli and MS Dhoni : विराट कोहली पुन्हा चांगल्या फॉर्ममध्ये आला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने 113 धावांची आक्रमक खेळी केली. हे त्याचे 45 वे वनडे शतक आहे. सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक 49 वनडे शतकांच्या विक्रमापासून तो आता फक्त 4 पावले दूर आहे. श्रीलंकेविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना आज कोलकाता येथे होणार आहे. अशा स्थितीत कोहली पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यात यशस्वी होईल, अशी आशा सर्वांना आहे.

दरम्यान, टीम इंडियाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनी त्यांच्या 'Coaching Beyond' या पुस्तकात कोहली आणि एमएस धोनी यांच्या नात्याबाबत मोठा खुलासा केला आहे. श्रीधरने लिहिले आहे की, कसोटी कर्णधारपद मिळाल्यानंतर कोहली एकदिवसीय आणि टी-20 संघाचे नेतृत्व करण्यास खूप उत्सुक होता आणि त्याने माजी कर्णधार धोनीकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली.

virat kohli spoiled the relationship with ms dhoni
WC Points Table: पाकिस्तानचा पराभव टीम इंडियाला धक्का! भारताचं नंबर १चं स्थान 'या' संघाने हिसकावलं

आर श्रीधर यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, 2016 मध्ये एक वेळ आली होती, जेव्हा विराट कोहली कसोटीशिवाय पांढऱ्या चेंडूच्या संघाचा कर्णधार बनण्यासाठी खूप उत्सुक होता. त्याला या फॉरमॅटचे कर्णधारपदही हवे आहे, असे त्याच्या अनेक बोलण्यातून दिसत होते. यानंतर टीम डायरेक्टर रवी शास्त्री यांनी त्याला बोलावून समजावून सांगितले.

गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्याची माहिती आहे. 2021 च्या टी-20 विश्वचषकानंतर, त्याने टी-20 कर्णधारपदाचा राजीनामा दिला, तर बोर्डाने नंतर त्याच्याकडून ODI संघाचे कर्णधारपद परत घेतले.

virat kohli spoiled the relationship with ms dhoni
Jasprit Bumrah: आता बुमराहशिवाय खेळण्याची तयारी करा... माजी क्रिकेटपटूने स्पष्टच सांगितलं

रवी शास्त्री यांनी विराट कोहलीला सांगितले की, तुला कसोटी संघाचे कर्णधारपद मिळाले आहे. सध्या धोनी पांढऱ्या चेंडूच्या संघाचा कर्णधार आहे आणि तु त्याचा आदर केला पाहिजे. योग्य वेळी धोनी तुला पांढऱ्या चेंडूच्या संघाचे कर्णधारपदही देईल. जर तु त्याचा आदर केला तर तु कर्णधार झाल्यावर बाकीचे खेळाडू तुझा आदर करतील. कर्णधारपदाच्या मागे धावू नका, एक दिवस तुला कर्णधारपद मिळेल. श्रीधरने सांगितले की कोहलीने शास्त्रींचा मुद्दा मान्य केला आणि नंतर कोहलीला पांढऱ्या चेंडूच्या संघाचे कर्णधारपद मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com