Mohammed Shami : एक ही मारा मगर सॉलिड मारा! षटक 1 धावा 4 विकेट 4 अजून काय पाहिजे?

Mohammed Shami Last Over Wonder India Defeat Australia In First Practice Match Before T20 World Cup 2022
Mohammed Shami Last Over Wonder India Defeat Australia In First Practice Match Before T20 World Cup 2022esakal

Mohammed Shami India Vs Australia Warm Up Match : मोहम्मद शमीने आजच्या सराव सामन्यात फक्त एकच षटक टाकले. ते देखील सामन्याचे महत्वाचे 20 वे षटक. या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 11 धावांची गरज होती. मात्र शमीने फक्त 4 धावात तब्बल तीन विकेट घेत भारताला सामना 6 धावांनी जिंकून दिला. भारताचे 187 धावांचे आव्हान पार करताना ऑस्ट्रेलियाला 20 षटकात सर्वाबाद 180 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार फिंचने सर्वाधिक 76 धावांची खेळी केली.

Mohammed Shami Last Over Wonder India Defeat Australia In First Practice Match Before T20 World Cup 2022
Kagiso Rabada Viral Video : रबाडाची हिंदी ऐकून भावी सासरेबुवांना आली असेल चक्कर

भारताचे 187 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने दमदार सुरूवात केली. जरी मिशेल मार्श 18 चेंडूत 35 धावा करून बाद झाला असला तरी त्याने पॉवर प्लेमधील आपली भुमिका चोख पार पाडली. त्यानंतर कर्णधार फिंचने 32 चेंडूत 41 धावा करत ऑस्ट्रेलियालने 10 षटकात 1 बाद 94 धावा केल्या.

मात्र यानंतर भारतीय फिरकीपटू युझवेंद्र चहलने स्टीव्ह स्मिथला 11 धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. दरम्यान, फिंच आणि मॅक्सवेलने 11 व्या षटकात ऑस्ट्रेलियाला शतक पार करून दिले. मॅक्सवेल आणि फिंच यांनी जोडी डोकेदुखी ठरत असताना भुवनेश्वर कुमारने मॅक्सवेलला बाद केले. मॅक्सवेलने 16 चेंडूत 23 धावा केल्या.

त्यानंतर अर्शदीप सिंगने मार्कस स्टॉयनिसला 7 धावांवर बाद करत मोक्याच्या क्षणी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. सामना 12 चेंडूत 16 धावा असा आला असताना हर्षल पटेलने 54 चेंडूत 76 धावा करणाऱ्या फिंचचा त्रिफळा उडवत भारताला मोठा दिलासा दिला. पाठोपाठ विराट कोहलीने टीम डेव्हिडला धावबाद केले. हर्षल पटेलने 19 वे षटक चांगले टाकले. त्याने फक्त 5 धावा देत एक बळी देखील मिळवला.

यामुळे शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 11 धावांची गरज असताना मोहम्मद शमी गोलंदाजीला आला. त्याने पहिल्या दोन चेंडूवर तीन धावा दिल्या. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर पॅट कमिन्सला बाद केले. विराट कोहलीने कमिन्सचा बाऊंड्री लाईनवर अप्रतिम झेल घेतला. पुढच्याच चेंडूवर एगर देखील शुन्यावर धावबाद झाला. शमीने पुढच्या चेंडूवर यॉर्कर टाकत इग्लिसचा त्रिफळा उडवला. आता ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 1 चेंडूत 7 धावांची गरज होती. शमीने पुन्हा यॉर्कर टाकून रिचर्डसनचा त्रिफळा उडवला आणि भारताला सामना 6 धावांनी जिंकून दिला.

Mohammed Shami Last Over Wonder India Defeat Australia In First Practice Match Before T20 World Cup 2022
Suryakumar Yadav : स्मार्ट सूर्याला जमतं मग इतरांना का नाही?

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सराव सामन्यात 20 षटकात 7 बाद 186 धावा केल्या. भारताकडून सलामीवीर केएल राहुल आणि सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी केली. राहुलने 33 चेंडूत 57 धावांची तर सूर्यकुमारने 33 चेंडूत 50 धावांची खेळी केली.

भारताचे प्रमुख फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मोठी खेळी करण्यात अपयश आले. रोहित शर्मा 14 चेंडूत 15 धावा तर विराट कोहली 13 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. भारताचा मॅच फिनिशर हार्दिक पांड्याने देखील निराशा केली. तो 5 चेंडूत 2 धावा केल्या. मात्र सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीवरील बाऊन्सचा योग्य प्रकारे वापर करून घेत चांगले फटके मारले. त्याला दिनेश कार्तिकने 14 चेंडूत 20 धावा करून चांगली साथ दिली.

मात्र मोक्याच्या क्षणी भारताच्या विकेट्स पडल्याने भारताला 200 चा आकडा गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून रिचर्डसनने 30 धावात 4 बळी घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com