Mohammad Shami : मोहम्मद शमीच्या अडचणीत वाढ!, आता पत्नीने ठोठवला सुप्रीम कोर्टाचा दरवाजा

Mohammed Shami faces fresh legal trouble : मोहम्मद शमीला पत्नी हसीन जहाँकडून कायदेशीर नोटीसही पाठवली गेली आहे.
Mohammad Shami

Mohammad Shami

Sakal
Updated on

Mohammed Shami’s Wife Approached the Supreme Court : मोहम्मद शमीला आता सर्वोच्च न्यायालयाच्या चक्करा माराव्या लागणार असल्याचे दिसत आहे. कारण त्याची पत्नी हसीन जहाँने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे आणि आता सर्वोच्च न्यायालयाने मोहम्मद शमीला नोटीसही बजावली गेली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने दाखल केलेल्या याचिकांवर हा निर्णय दिला आहे. जहानने भरणपोषण याचिका आणि घरगुती हिंसाचाराच्या तक्रारीसह विविध वैवाहिक कार्यवाही पश्चिम बंगालहून दिल्लीला हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे.

हसीन जहाँने याचिकेत म्हटले आहे की तिने ७ एप्रिल २०१४ रोजी मोहम्मद शमीशी इस्लामिक रितीरिवाजानुसार लग्न केले आणि १७ जुलै २०१५ रोजी त्यांना एक मुलगी झाली. २०१८ मध्ये तिने घरगुती हिंसाचार कायद्याच्या कलम १२ अंतर्गत कारवाई सुरू केली, ज्यामध्ये शमी आणि त्याच्या कुटुंबाने लग्नानंतर तिचा आणि तिच्या अल्पवयीन मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला.

Mohammad Shami
Betel Leaf : पान खाल्ल्याने ‘शुगर लेव्हल’ वाढते का? जाणून घ्या, तज्ञांचे मत!

तिने लेखी तक्रार दाखल केली, जी एफआयआर म्हणून नोंदवण्यात आली आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली जाधवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com