Mohammed Shami : पाटा खेळपट्टीवर पंजा! मोहालीने शमीला तर शमीने ऑस्ट्रेलियाला चांगलाच घाम फोडला

Mohammed Shami
Mohammed Shamiesakal

Mohammed Shami : ऐन पावसाळ्यात टीम इंडियाला मोहालीत प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागला. मात्र या उकाड्यातही मोहम्मद शमीने आपल्या कामगिरीने टीम इंडियाच्या कळपात गारवा निर्माण केला.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात मोहम्मद शमीने मोहालीची पाटा खेळपट्टी अन् प्रचंड उकाडा यांचा सामना करत ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ गारद केला. ऑस्ट्रेलियाला 50 षटकात 10 बाद 276 धावांपर्यंतच मजल मारता आली. कांगारूंनकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 51 धावा केल्या. तर जॉश इंग्लिसने 45 आणि स्टीव्ह स्मिथने 41 धावांचे योगदान दिले.

Mohammed Shami
IND Vs AUS 1st ODI Live Score: ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर 277 धावांचे आव्हान, शमीने निम्मा संघ केला गारद

भारताने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात मिचेल मार्शला 4 धावावर बाद करत कांगारूंना मोठा धक्का दिला होता.

मात्र यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी सावध सुरूवात करत 12 व्या षटकात संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. या दोघांनी 94 धावांची भागीदारी रचली. अखेर ही जोडी रविंद्र जेडजाने फोडली. त्याने डेव्हिड वॉर्नरला 52 धावांवर बाद केले. पाठोपाठ मोहम्मद शमीने स्मीथचा देखील 29 धावांवर त्रिफळा उडवत कागारूंचा अजून एक सेट झालेला फलंदाज माघारी धाडला.

Mohammed Shami
CWC 2023 Prize money : यंदाचा वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघावर लक्ष्मी होणार प्रसन्न; दहा - वीस नाही तर मिळणार इतके कोटी रूपये

यानंतर आलेल्या मार्नस लाबुशेन आणि कॅमरून ग्रीन यांनी ऑस्ट्रेलियाला दीडशतकी मजल मारून दिली. ही जोडी धोकादायक होणार असे वाटत असतानाच अश्विनने लाबुशेनला 39 धावांवर बाद केले. पाठोपाठ ग्रीन देखील 31 धावांवर बाद झाला. ग्रीन बाद झाला त्यावेळी कांगारूंच्या 5 बाद 186 धावा झाल्या होत्या.

कांगारूंचा डाव आता घसरला असे वाटत होते. मात्र मार्कस स्टॉयनिस आणि जॉश इंग्लिस यांनी स्लॉग ओव्हरमध्ये कांगारूंना 250 च्या जवळ नेऊन ठेवले. मात्र 21 चेंडूत 29 धावा करणाऱ्या स्टॉयनिसचा शमीने त्रिफळा उडवत ही जोडी फोडली.

इंग्लिस 45 धावा करून बुमराहची शिकार झाला. मोहम्मद शमीने एबॉटला 2 धावावर बाद करत आपली पाचवी शिकार केली. यानंतर मात्र कर्णधार पॅट कमिन्सने 9 चेंडूत नाबाद 21 धावा ठोकत ऑस्ट्रेलियाला 276 अशी सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. शेवटच्या चेंडूवर शार्दुल ठाकूरने झाम्पाला बाद करत कांगारूंचा डाव संपवला.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com