Mohammed Shami : शमी रागात होता, क्रिकेट सोडणार होता; रवी शास्त्री त्याला असं काही बोलले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohammed Shami

Mohammed Shami : शमी रागात होता, क्रिकेट सोडणार होता; रवी शास्त्री त्याला असं काही बोलले...

Mohammed Shami : भारताचे माजी गोलंदाज प्रशिक्षक भारत अरूण यांनी क्रिकबझशी बोलताना भारताचा अव्वल वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी बद्दल अनेक माहिती नसलेल्या गोष्टींचा उलगडा केला. अरूण यांनी शमीचा एक किस्सा सांगितला. ज्यावेळी शमी क्रिकेट सोडण्याच्या विचाराच होता. संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शमीला काय सांगून त्याला मोटिवेट केले हे देखील अरूण यांनी सांगितले.

अरूण क्रिकबझशी बोलताना म्हणाले की, 'इंग्लंडच्या 2018 च्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी आधी आम्ही फिटनेस टेस्ट घेतली होती. त्यात मोहम्मद शमी फेल झाला होता. शमीने त्याची संघातील जागा देखील गमावली होती. त्यानंतर त्याने मला कॉल केला आणि बोलायचं असं म्हणाला. मी त्याला माझ्या रूममध्ये बोलावलं. त्यावेळी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ उठले होते.'

अरूण पुढे म्हणाले, 'शमीचा फिटनेसवर खूप परिणाम झाला होता. तो मानसिकदृष्ट्या खचला होता. तो माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला की मला खूप राग आला आहे. मला क्रिकेट सोडायचं आहे. त्यावेळी मी त्याला लगेच रवी शास्त्रींकडे घेऊन गेलो. मी रवी शास्त्रींनी म्हणालो की शमीला तुमच्याशी बोलायचं आहे. शमीने मला जे सांगितले तेच रवी शास्त्रींना देखील सांगितले. मला क्रिकेट खेळायचं नाहीये. त्यानंतर आम्ही दोघांनी त्याला विचारलं की जर तू क्रिकेट खेळणार नाहीस तर काय करणार? तुला दुसरं काय येतं? तुला हातात चेंडू आल्यावर तो कसा टाकायचा हे येत.'

यानंतर रवी शास्त्री यांनी शमीला सांगितले की, 'तुला राग आला आहे चांगली गोष्ट आहे. तुझ्या हातात बॉल आहे तुझा फिटनेस खराब झाला आहे. तुझ्या मनात जो राग आहे तो तुझ्या शरिरावर काढ. आम्ही तुला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवत आहोत. तेथे 4 आठवडे रहा. तू घरी जायचं नाहीस तू थेट एनसीएमध्ये जाशील.'

शमीला हे सूट झालं कारण त्याला कोलकात्याला जाण्यात अडचण होती. त्याने एनसीएमद्ये 5 आठवडे घालवले. अरूण म्हणाले की, मला आठवतय की त्याने मला फोन केला आणि म्हणाला की सर मला स्टॅलोन सारखं व्हायचं आहे. मला जेवढ हवं तेवढं पळवा. त्या 5 आठवड्यात त्याला कळून चुकलं की फिटनेसवर काम करणं किती गरजेचं आहे.'

यानंतर मोहम्मद शमीने 2018 च्या इंग्लंड दौऱ्यावर पुनरागमन केले. तो त्या मालिकेत इशांत शर्मानंतर भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठऱला.

(Sports Latest News)