Women’s T20 WC: 27 धावात 8 फलंदाज गारद! सलग दोन पराभवानंतर न्यूझीलंड विश्वचषकातून बाहेर

Women’s T20 World Cup
Women’s T20 World Cupsakal

Women’s T20 World Cup : आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेतील गट सामन्यात सोमवारी दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंड संघावर 67 धावांनी विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेला पहिल्या सामन्यात श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचवेळी न्यूझीलंडला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. किवी संघ विश्वचषकातून बाहेर होण्याच्या मार्गावर पोहोचला आहे.

Women’s T20 World Cup
WPL Auction 2023: पहिल्याच हंगामात WPLने दाखवून दिली PSLची गरिबी! बाबरवर भारी पडल्या तब्बल 15 महिला क्रिकेटर

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाच्या 3 विकेट 46 धावांत पडल्या. ट्रायनसह कर्णधारने डाव सांभाळला. कर्णधारने 17 चेंडूंत 4 चौकारांसह 22 धावा केल्या. ट्रायॉनने 34 चेंडूत 6 चौकारांसह 40 धावांची खेळी खेळली. नादिन डी क्लर्कने 26 चेंडूत 28 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 6 गडी गमावून 132 धावा केल्या.

Women’s T20 World Cup
PSL Opening: बिचारे पाकिस्तान! फटाके पण उडवता येत नाही, लागली स्टेडियममध्ये आग Video Viral

लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खूपच खराब झाली. सलामीवीर बर्नाडाइन आणि सुझी बेट्स सलग दुसऱ्या सामन्यात खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले. 10व्या षटकात न्यूझीलंडची धावसंख्या 31 धावा होती आणि अर्धा संघ बाद झाला होता. सर्वाधिक धावा कर्णधार सोफी डिव्हाईनने केल्या.

न्यूझीलंडच्या फलंदाजीची अवस्था अशी होती की 8 फलंदाज मिळून 27 धावा करू शकले. दक्षिण आफ्रिकेने किवी संघाला 67 धावांत गुंडाळत 65 धावांनी विजय मिळवला. विश्वचषकात न्यूझीलंडची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा दुसरा सामना 15 फेब्रुवारीला वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे. हरमनप्रीतच्या संघाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com