

Mohammed Siraj
esakal
भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज मोहम्मद सिराजला बुधवारी गुवाहाटी ते हैदराबाद प्रवासादरम्यान एअर इंडिया एक्सप्रेसच्या सेवेमुळे प्रचंड निराशा सहन करावी लागली. त्याच्या फ्लाइटला प्रथम चार तास उशीर झाला आणि नंतर ती पूर्णपणे रद्द करण्यात आली. यामुळे संतापलेल्या सिराजने थेट सोशल मीडियावर आपली तक्रार नोंदवली.