Yuvraj Singh : आईने युवराजची कॉलर धरून काढले घराबाहेर; सिक्सर किंगने केला मोठा कांड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yuvraj Singh Video

Yuvraj Singh Video : आईने युवराजची कॉलर धरून काढले घराबाहेर; सिक्सर किंगने केला मोठा कांड

Yuvraj Singh Video : भारताचा माजी डावखुरा फलंदाज युवराज सिंग सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असतो. युवराज आपल्या आयुष्यातील घडामोडींबाबत आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावरून सतत अपडेट देत असतो. त्याचे इन्स्टाग्राम रील्स आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

युवराज सिंगने नुकतेच आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत युवराजची आई शबनम सिंह युवराज आणि त्याचा भाऊ झोरावरला कॉलरला धरून घराबाहेर काढताना दिसत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला 'कुन फाय कुन' हे रॉकस्टारमधील गाणे वाजत असते. युवराज सिंगने या व्हिडिओला 'सांगा आम्ही काही चुकीचं केलं आहे का?' असे कॅप्शन दिले.

या व्हिडिओमध्ये युवराज आणि झोरावरला त्यांची आई घराबाहेर काढते कारण हे दोघे आईच्या सांगण्यावरून भाजी मार्केटमध्ये जातात आणि कोथिंबीरच्या ऐवजी पुदीना घेऊन येतात. या व्हिडिओमध्ये टेक्स्ट लिहिले होते की, काही नाही भावांनो मम्मीने भाजी आणायला पाठवले होते. कोथिंबीरच्या ऐवजी आम्ही पुदिना घेऊन आलो.'

युवराजची ही रील आतापर्यंत 9 लाख वेळा पाहिला गेला आहे. तर 19 लाखाच्यावर लाईक्स देखील मिळाले आहे. कमेंट बॉक्समध्ये देखील युवराजच्या या व्हिडिओवर कमेंटचा पाऊस पडला आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!