T20 WC: 'मेंटॉर' धोनीचा पहिला फोटो व्हायरल; लाईक्सचा वर्षाव!

MS Dhoni
MS Dhoni
Summary

BCCI ने फोटो पोस्ट करत धोनीचा किंग असा केला उल्लेख

T20 World Cup 2021: माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिलावहिला टी२० विश्वचषक जिंकला. २००७ च्या टी२० विश्वचषकात धोनीने युवा टीम इंडियाला साथीला घेऊन दमदार कामगिरी केली. त्यानंतर मात्र भारताला अद्याप टी२० वर्ल्डकप जिंकता आलेला नाही. पण यंदाच्या विश्वचषक विजेतेपदासाठी भारताला प्रबळ दावेदार मानलं जातंय. तशातच भारतीय संघातून निवृत्त झालेला धोनी टीम इंडियासोबत एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. धोनीला संघाचा मार्गदर्शक म्हणजेच मेंटॉर म्हणून स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे धोनीचा 'मेंटॉर' भूमिकेतील फोटो सध्या चर्चेत आहे.

MS Dhoni
Video : T20 World Cup स्पर्धेच्या पहिल्या दिवशी हॅटट्रिक हुकली!

टी२० विश्वचषक संघाची ज्यावेळी घोषणा करण्यात आली. तेव्हा त्यासोबतच धोनी संघाचा मेंटॉर असेल याबद्दलही माहिती BCCI चे सचिव जय शाह यांनी दिली होती. नुकतीच धोनीच्या संघाने IPL ट्रॉफी जिंकली. खेळाडूच्या भूमिकेतील धोनी टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये कशाप्रकारे काम करेल याकडे सध्या साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. त्यातच, BCCI ने रविवारी एक फोटो पोस्ट केला. त्यात धोनीचा मेंटॉर म्हणून काम करतानाचे दोन फोटो पोस्ट करण्यात आले. या फोटोला, "किंग'चे टीम इंडियामध्ये स्वागत. धोनी टीम इंडियामध्ये परत आला आहे आणि आता तो नव्या भूमिकेत आहे", असे कॅप्शन देण्यात आले आहे.

पाहा 'मेंटॉर' धोनीचे फोटो-

MS Dhoni
T20 World Cup: मराठमोळ्या शार्दूलची 'टीम इंडिया'मध्ये एन्ट्री!!

दरम्यान, भारतीय संघाचा टी२० विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना आज होणार आहे. भारत आज स्पर्धेच्या सराव सामन्यात इंग्लंडविरूद्ध दोन हात करणार आहे. तर २० ऑक्टोबरला भारताचा ऑस्ट्रेलियाविरूद्ध सामना रंगणार आहे. हे दोन्ही सामना सराव सामने असतील. मूळ स्पर्धा २३ तारखेला सुरू होणार असून भारताचा सलामीचा सामना २४ तारखेला पाकिस्तानशी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com