T20 World Cup: पालघरच्या मराठमोळ्या शार्दूलची 'टीम इंडिया'मध्ये एन्ट्री!! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shardul Thakur

T20 World Cup: मराठमोळ्या शार्दूलची 'टीम इंडिया'मध्ये एन्ट्री!!

मुंबई: पालघरच्या (palghar) मराठमोळ्या शार्दूल ठाकूरला (Shardul thakur) टी २० वर्ल्डकप (t 20 world cup) संघात स्थान मिळालं आहे. सध्या शार्दूल आयपीएलममध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून (Csk) खेळत आहे. दिल्ली कॅपिटलच्या अक्सर पटेलच्या जागी त्यांची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

निवड समितीने संघ व्यवस्थापनासोबत चर्चा केल्यानंतर शार्दूलचा भारतीय संघात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ सदस्यीय संघाचा भाग असलेला अष्टपैलू अक्सर पटेलचा आता स्टँड बाय खेळाडूंमध्ये समावेश झाला आहे. बीसीसीआयने स्टेटमेंटमधून ही माहिती दिली आहे.

मूळचा पालघर जिल्ह्यातील असलेल्या शार्दूल पटेलने आपल्या दमदार कामगिरीच्या बळावर भारतीय संघात स्थान मिळवले आहे. शार्दूलने अनेकदा मिळालेल्या संधीचे सोने करुन दाखवले आहे. गोलंदाजी बरोबर तो उपयुक्त फलंदाजी सुद्धा करतो. फलंदाजीच्या बळावर सुद्धा त्याने काही सामने जिंकून दिले आहेत. कर्णधाराने त्याच्यावर ठेवलेला विश्वास त्याने प्रत्येकवेळी सार्थ करुन दाखवला आहे. सध्या तो सीएसकेच्या गोलंदाजीचा भार वाहत आहे.

टी २० वर्ल्डकपसाठी भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशांत किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, शार्दूल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी,

टॅग्स :Shardul Thakur