हार्दिक पांड्याला आठवला धोनी भाऊचा जुना किस्सा; मी वर्ल्डकपमध्ये...

खराब फॉर्म आणि दुखापतीमुळे काही काळ भारतीय संघाबाहेर असलेल्या पांड्या...
ms dhoni hardik pandya
ms dhoni hardik pandya sakal

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सला त्याच्या नेतृत्वाखाली आयपीएल चॅम्पियन बनवल्यानंतर T20 विश्वचषकाच्या प्रबळ दावेदारांमध्ये सामील झाला आहे. खराब फॉर्म आणि दुखापतीमुळे काही काळ भारतीय संघाबाहेर असलेल्या पांड्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया कडून खेळणार आहे. सोमवारी दिल्लीतील पहिल्या सराव सत्रात पांड्याने भाग घेतला. दरम्यान, पांड्याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी संबंधित एक मोठा किस्सा उघड केला आहे.

ms dhoni hardik pandya
Ranji Trophy : आयपीएल स्टार रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच दिवशी फेल

हार्दिक पांड्याने जानेवारी 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पांड्याने आता महेंद्रसिंग धोनीशी संबंधित एक किस्सा उघड केला आहे, ज्यामुळे पांड्याला त्याच्या पदार्पणाचा सामना पुन्हा एकदा आठवला. हार्दिक पांड्याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात पाहिल्याचं षटकात 21 धावा दिल्या होत्या. तिन्ही सामन्यांत त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. तीन सामन्याच्या मालिकेमध्ये त्याला मात्र 3 विकेट मिळाले.

पांड्याने सांगितले की, पदार्पण झाल्यावर पहिले तीन सामने खेळल्यानंतरच माही भाईने मला सांगितले तू विश्वचषक संघात असणार आहे. तीन सामन्यातून विश्वचषकात खेळणार हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. मी कोणत्याही सामन्यात फलंदाजी केली नव्हती. माही भाईने मला आश्वासन दिले की तू स्वत:ला सिद्ध केले आहेस. पण हो हे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे होते.

ms dhoni hardik pandya
इंजेक्शन घेऊन टेनिस कोर्टवर उतरला अन्‌ फ्रेंच ओपन जिंकला

हार्दिक पांड्याने 2021 च्या T20 विश्वचषकानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली 9 जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत पांड्या खेळताना दिसलं. भारताला दक्षिण आफ्रिकेसोबत पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. यानंतर संघ आयर्लंडसोबत दोन टी-20 सामने खेळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com