World Cup 2019 : धोनी रोज वापरतोय वेगळी बॅट; तो खरंच निवृत्त होतोय

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 July 2019

धोनीने विश्वकरंडकात BAS आणि SG बॅटचाही वापर केला. त्यावर तो या प्रायोजकांकडून कोणतेही मानधन घेत नसल्याचे पांडे यांनी स्पष्ट केले. 

वर्ल्ड कप 2019 : लंडन : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सध्या सुरु असलेल्या विश्वकरंडकानंतर निवृत्त होणार अशा चर्चांना उधाण आले आहे. त्यातच त्याचे मॅनेजर अरुण पांडे यांनी त्याच्या निवृत्तीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. धोनी सध्या प्रत्येक सामन्यात वेगवेगळ्या प्रायोजकांच्या बॅट वापरुन त्यांचे आभार मानत आहे. 

धोनीने विश्वकरंडकात BAS आणि SG बॅटचाही वापर केला. त्यावर तो या प्रायोजकांकडून कोणतेही मानधन घेत नसल्याचे पांडे यांनी स्पष्ट केले. 

''धोनी प्रत्येक सामन्यात वेगवेगळ्या प्रायोजकांच्या बॅट वापरत आहे हे खरं आहे. मात्र, त्यासाठी तो कोणतेही मानधन स्वीकारत नाहीये. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याला साथ देणाऱ्या या सर्व प्रायोजकांचे आभार मानत आहे. त्याला पैशांची कमी नाही, तो या प्रायोजकांकडून कोणतेच पैसे घेत नाही. मात्र, त्यांना सदिच्छा दर्शविण्यासाठी तो या बॅट वापरत आहे. त्याच्या कारकिर्दीच्या सुरवातीपासून BAS त्याच्यासोबत होते तर SGने सुद्धा त्याला पाठींबा दिला आहे,'' असे स्पष्टीकरण पांडे यांनी दिले आहे. 

सध्या सुरु असलेल्या विश्वकरंडकानंतर धोनी निवृत्ती घोषित करण्याची शक्यता असल्याचे पीटीआयने काल जाहीर केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MS Dhoni Hints about his retirement after 2019