‘कॅप्टन कूल’ अशी ओळख असलेला भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या शिरपेचात आणखी एका मानाचा तुरा रोवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकताच त्याचा समावेश हॉल ऑफ फेममध्ये केला आहे. हा सन्मान मिळवणारा धोनी हा भारताचा ११ वा खेळाडू ठरला आहे.