धोनी अन् मिताली राज यांच्या करिअरमधील पाच साम्य

मिताली राजच्या निवृत्तीसह क्रिकेट जगतात महेंद्र सिंह धोनीचीदेखील रंगली चर्चा.
MS Dhoni and Mithali Raj
MS Dhoni and Mithali Rajesakal

भारतीय महिला क्रिकेट कसोटी आणि वनडे संघाची कर्णधार मिताली राजने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ३९ वर्षीय मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३ वर्षे भारताचे प्रतिनिधित्व केले. तिच्या निवृत्तीच्या घोषणे नंतर चर्चेला उधाण आले. दरम्यान, क्रिकेट जगतात एक वेगळीच चर्चा रंगली आहे. तिच्या निवृत्तीसह माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचीदेखील चर्चेत आला आहे. दोघांच्या निवृत्तीमध्ये अनेक साम्य दडले असल्याचे सांगण्यात येत आहे.

MS Dhoni and Mithali Raj
मिताली राजनंतर हरमनप्रीत कौरवर संभाळणार संघाची जबाबदारी
  • दोघांनी भारतासाठी सर्वाधिक सामने खेळले, धोनीने कर्णधार म्हणून 332 वेळा टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले, तर भारतीय महिला संघ मिताली राजच्या नेतृत्वाखाली 195 वेळा खेळला.

  • एकदिवसीय विश्वचषकात धोनी आणि मिताली राज यांनी भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता.

  • यादरम्यान दोन्ही खेळाडूंनी अर्धशतके झळकावली.

  • धोनी आणि मितालीच्या अर्धशतकांमुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आणि भारत विश्वचषकातूनही बाहेर पडला.

  • विश्वचषकानंतर दोन्ही खेळाडूंनी फेयरवेल मॅच न खेळता निवृत्ती घेतली.

MS Dhoni and Mithali Raj
मिताली राजने निवृत्ती घेतानाच दिले 'सेकंड इंनिंग'चे संकेत

महेंद्रसिंग धोनीने 2019 च्या विश्वातील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना इंग्लंडमध्ये खेळला होता. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. धोनीने पुढील वर्षी 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

39 वर्षीय मिताली राजने 8 जून रोजी ट्विटरवर निवृत्तीची घोषणा केली. मिताली राजने न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तिच्या नेतृत्वाखाली संघ उपांत्य फेरीपूर्वी बाहेर पडला. हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा विश्वचषक असल्याचे बोलले जात होते आणि तसेच झाले. काही वर्षांपूर्वी त्याने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com